Rahul Gandhi on Election Commission: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.८) पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. बंगळुरुमधील एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, देशातील संस्था नष्ट होत आहेत. संविधानाशी छेडछाड केली जात आहे. मतांची चोरी ही संविधानाशी विश्वासघात आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत संविधान वाचवायचे आहे.
मतांशी छेडछाड झालीबंगळुरुमधील फ्रीडम पार्क येथील मतदान हक्क रॅलीत राहुल गांधी म्हणतात, संविधान प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देते. पण, आता देशातील संस्था नष्ट होत आहेत. संविधानाशी छेडछाड केली जात आहे. गेल्या निवडणुकीत भाजप, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेत्यांनी संविधानावर हल्ला केला. भारतातील संस्था नष्ट करुन संविधानावर हल्ला करण्यात आला. कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभेत ६.५० लाख मते आहेत, पण त्यापैकी सुमारे एक लाख मते चोरीला गेली. चोरी पाच प्रकारे झाली. डुप्लिकेट मतदार, म्हणजे एका मतदाराने अनेक वेळा मतदान केले. एका मतदाराने ५-६ मतदान केंद्रांवर मतदान केले. असे सुमारे ४० हजार लोक आहेत, ज्यांचा पत्ताही नव्हता. एका पत्त्यावर ४०-४० मतदार आहेत, असा दावा त्यांनी केला.
निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो...राहुल गांधी पुढे म्हणतात, निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो. मी संसदेत संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. आज जेव्हा भारतातील लोक आमच्या डेटाबद्दल आयोगाला प्रश्न विचारत आहेत, तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली आहे, कारण त्यांना माहित आहे की, जर भारतातील लोक या डेटाबद्दल प्रश्न विचारू लागले, तर त्यांचे खोटे सर्वांसमोर येईल.
आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्यावीआमची मागणी आहे की, आयोगाने आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्यावी. काल मी सिद्ध केले की, देशात मतांची चोरी झाली आहे. जर निवडणूक आयोग आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी देईल, तर आम्ही सिद्ध करू की, भारताचे पंतप्रधान मते चोरून पंतप्रधान झाले आहेत. जर निवडणूक आयोग आम्हाला डेटा देत नसेल, तर आम्ही हे काम फक्त एका जागेवर नाही तर १०, २० किंवा २५ जागांवरही करू शकतो. आमच्याकडे कागदी प्रती आहेत. तुम्ही लपू शकत नाही. एक मतदार अनेक वेळा मतदान करत आहे. एक ना एक दिवस तुम्हाला विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.