शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

'लोकसभेसह 4 राज्यांमध्ये एकाचवेळी निवडणूक घेण्यास आम्ही तयार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 8:03 PM

पुन्हा 'एकदा वन नेशन वन इलेक्शन'ची चर्चा

नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक होत असल्यास त्याच वेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आम्ही सक्षम आहोत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. 'वन नेशन वन इलेक्शन'वरुन देशभरात चर्चा सुरू असताना निवडणूक आयोगाचे आयुक्त ओ. पी. रावत यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. विशेष म्हणजे कालच रावत यांनी सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं. भाजपानं कालच वन नेशन वन इलेक्शनवरुन यू-टर्न घेतला होता. आधी वन नेशन वन इलेक्शनचा आग्रह धरणाऱ्या भाजपानं काल अचानक घूमजाव करत आपण अशी मागणी केलीच नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं. तर आज निवडणूक आयोगाचे आयुक्त ओ. पी. रावत यांनी भूमिकेत बदल केला. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शक्य नसल्याचं म्हणणाऱ्या रावत यांनी आज वेगळी भूमिका मांडली. लोकसभा निवडणूक निर्धारित वेळेच्या आधी घेतल्यास निवडणूक आयोग त्याचवेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यास सक्षम असल्याचं रावत म्हणाले. डिसेंबरमध्ये चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह लोकसभेची निवडणूक घेण्यास आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांवेळीच लोकसभा निवडणूक झाल्यास त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे का, असा प्रश्न निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना रावत यांनी डिसेंबरमध्ये चार राज्यांसह लोकसभा निवडणूक घेण्यास सक्षम असल्याचं म्हटलं. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 15 डिसेंबरला संपणार आहे. तर छत्तीसगड विधानसभेची मुदत 5 जानेवारी 2019 रोजी संपेल. मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे 7 जानेवारी आणि 20 जानेवारीला संपणार आहे.  

टॅग्स :Electionनिवडणूकcommissionerआयुक्तlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rajasthanराजस्थानChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा