निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:12 IST2025-10-27T16:47:30+5:302025-10-27T17:12:33+5:30
निवडणूक आयोगाने देशभरात मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली.

निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
निवडणूक आयोगाने देशव्यापी मतदार यादी पुनरीक्षण (SIR) जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. मतदार यादी दुरुस्ती मोहिम' ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत त्या राज्यामध्ये आधी होणार असल्याचे सांगितले.
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
बिहारमधील मतदार यादी दुरुस्ती मोहिम' च्या तयारीच्या आधारे, निवडक राज्यांमध्ये SIR सुरू केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर १००० मतदार असतील. SIR चा दुसरा टप्पा १२ राज्यांमध्ये सुरू होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
बिहारमधील मतदार यादी दुरुस्ती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. अंदाजे ७.४२ कोटी नावे असलेली अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली. बिहारमध्ये मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
#WATCH | CEC Gyanesh Kumar announces the schedule of phase 2 of SIR (Special Intensive Revision) to be carried out in 12 States/UTs.
— ANI (@ANI) October 27, 2025
Printing/Training - 28th Oct to 3rd Nov 2025
House to House Enumeration Phase - 4th Nov to 4th Dec 2025
Publication of Draft Electoral Rolls -… pic.twitter.com/TZgHoU1E4g
असे आहे SIR चे वेळापत्रक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यावेळी वेळापत्रक स्पष्ट केले. SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. छपाई आणि प्रशिक्षण २८ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालेल. ४ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ पर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली जाईल. ९ डिसेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी सादर केली जाणार आहे.
