शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; 11 डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 16:23 IST

मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला निवडणूक होईल. छत्तीगसडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल. या पाचही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या सर्व राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत दिली.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला होईल. यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर आहे. या टप्प्यात 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. तप उर्वरित जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल. मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. 28 नोव्हेंबर रोजी या दोन्ही राज्यांमधील नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील.राजस्थान आणि तेलंगाणातदेखील एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 7 डिसेंबरला या दोन्ही राज्यांमध्ये मतदान होईल. या सर्व राज्यामध्ये 11 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या पाचही राज्यांमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा आहेत मतदानाच्या तारखा:  छत्तीसगड- पहिला टप्पा- 12 नोव्हेंबर (18 जागांसाठी मतदान)त्तीसगड- दुसरा टप्पा- 20 नोव्हेंबर (72 जागांसाठी मतदान)मध्य प्रदेश आणि मिझोरम- एकच टप्पा- 28 नोव्हेंबरराजस्थान आणि तेलंगणा- एकच टप्पा- 7 डिसेंबर सर्व राज्यांमध्ये मतमोजणी- 11 डिसेंबर

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानChhattisgarhछत्तीसगडTelanganaतेलंगणा