शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला रडू कोसळले, 67 लाख रुपये हडपल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 16:57 IST

UP Election : बसपा नेते अर्शद राणा यांच्या तक्रारीवरून निरीक्षक आनंद देव मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (UP Assembly Election) भाजपामधील आमदार आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू असतानाच दुसरीकडे बहुजन समाज पार्टीची (बसपा) स्थितीही फारशी चांगली दिसत नाही, कारण बसपाच्या तिकीट विक्रीचे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आहे. हे प्रकरण मुझफ्फरनगरच्या पोलीस स्टेशन कोतवाली भागातील आहे, जिथे चरथावल विधानसभा मतदारसंघाचे बसपा प्रभारी अर्शद राणा गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलीस स्टेशन कोतवाली येथे पोहोचले आणि कोतवालीचे प्रभारी निरीक्षक आनंद देव मिश्रा यांच्याकडे तक्रार दाखल करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

शमशुद्दीन राईन यांच्यावर आरोप18 डिसेंबर 2018 रोजी जिल्ह्याच्या विधानसभा जागांच्या प्रभारींची नियुक्ती जिल्हा कार्यालय, मुझफ्फरनगर येथे होणार होती. याच्या एक-दोन दिवस आधी बसपाचे पश्चिम उत्तर प्रदेश प्रभारी शमशुद्दीन राइन म्हणाले होते की, तुम्हाला चारथावल विधानसभा जागेसाठी उमेदवार म्हणून नियुक्त केले जाईल. यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील, त्यासाठी मी होकार दिला होता, असे अर्शद राणा यांनी सांगितले.

बसपाच्या मंचावर घोषित केले होते उमेदवार अर्शद राणा यांचा असा आरोप आहे की, ठरलेल्या तारखेला पार्टीच्या कार्यालयावर सहारनपूर विभागाचे मुख्य संयोजक नरेश गौतम, माजी मंत्री प्रेमचंद गौतम, सत्यप्रकाश, कार्डिनेटर आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष मुझफ्फरनगर सतपाल कटारिया आदींच्या उपस्थितीत बसपा पार्टीच्या मंचावर 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यासोबतच तुमच्या भागात जा आणि तुमचे काम करा, असे आश्वासन देण्यात आले.

'शमशुद्दीन राईन यांना दिले 67 लाख रुपये'अर्शद राणा म्हणाले, 'विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून नियुक्तीसाठी 4 लाख 50 हजार रुपये आणि त्यानंतर 50 हजार रुपये घेण्यात आले. यानंतर 15-15 लाखांचे तीन हप्ते घेण्यात आले. यानंतरही सतपाल कटारिया आणि नरेश गौतम यांच्या उपस्थितीत पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी शमशुद्दीन रैन यांनी थोडे-थोडे 17 लाख रुपये घेतले. चरथावळ विधानसभेच्या जागेवर तुमची उमेदवारी करण्यात आली असून तुम्ही मनापासून काम करू असा पूर्ण विश्वास त्यांनी दिला."

'सतीश कुमार यांनी मागितले 50 लाख रुपये'अर्शद राणा यांनी आरोप केला की, 'आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यावर मी बसपाचे जिल्हाध्यक्ष सतीश कुमार यांना चरथावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पार्टीकडून तिकीट मागितले, तेव्हा त्यांनी तुम्हाला आणखी 50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल, असे सांगितले. पण असे असतानाही सलमान सईद यांना चरथावळ विधानसभेचे उमेदवार घोषित करण्यात आले.

'न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू'बसपा नेते अर्शद राणा यांच्या तक्रारीवरून निरीक्षक आनंद देव मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना अर्शद राणा म्हणाले की, जर न्याय मिळाला नाही तर लखनऊ येथील बसपा कार्यालयात जाऊन आत्महत्या करू.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२