UP Election: विश्वनाथ मंदिरात पूजेसाठी नमाज पढण्याच्या शैलीत बसले अखिलेश यादव

By Admin | Updated: March 5, 2017 19:50 IST2017-03-05T13:58:43+5:302017-03-05T19:50:33+5:30

वाराणसीमध्ये शनिवारी विश्वनाथ मंदिरात पूजेसाठी नमाज पढण्याच्या शैलीत बसले अखिलेश

UP Election: Akhilesh Yadav sitting in the style of prayers to worship the Vishwanath temple | UP Election: विश्वनाथ मंदिरात पूजेसाठी नमाज पढण्याच्या शैलीत बसले अखिलेश यादव

UP Election: विश्वनाथ मंदिरात पूजेसाठी नमाज पढण्याच्या शैलीत बसले अखिलेश यादव

>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 5 - वाराणसीमध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचा रोड शो झाला. यावेळी पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मोदींव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
मात्र, दर्शन घेताना अखिलेश यादव यांच्या बसण्याच्या शैलीवरून वाद निर्माण झाला आहे. पूजा करताना अखिलेश नमाज पढण्याच्या शैलीत बसल्याचं दिसत आहे.त्यावर पूजा-यांनी त्यांना समजावल्यावर ते योग्य पद्धतीने बसले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  तरर टीकाकारांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. 
दरम्यान रोड शो संपल्यानंतर बाब विश्वनाथचं दर्शन घेण्यासाठी अखिलेश आले आणि त्याचवेळी तेथील वीज गेली. जवळपास 15 मिनिटांनंतर वीज आली पण त्यावरूनही अखिलेश यांच्यावर टीका होत आहे.  

Web Title: UP Election: Akhilesh Yadav sitting in the style of prayers to worship the Vishwanath temple