शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:56 IST

Election 2024: 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. यादरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना आपली जीव गमवावा लागला आहे.

Lok Sabha Elections 2024 Latest News : काल, म्हणजेच 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आली. एकीकडे संपूर्ण देशात एक्झिट पोलची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे अनेकांचा जीव जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीव्र उष्णतेमुळे निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेल्या 33 कर्मचाऱ्यांसह किमान 58 लोकांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आहेत. तिथे मिर्झापूर आणि सोनभद्र येथे निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या 15 कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाला. मिर्झापूरचे विभागीय आयुक्त मुथुकुमारसामी बी म्हणाले की, त्यापैकी तेरा जणांमध्ये सात होमगार्ड, तीन स्वच्छता कर्मचारी आणि एक लिपिक कर्मचारी यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, मृतांमध्ये होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी आणि इतर मतदान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण भर उन्हात दिवसभर मतदान प्रक्रियेदरम्यान कर्तव्यावर होते. ड्युटीवर मरण पावलेल्यांना 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रिनवा यांनी सांगितले.

बिहारमध्ये 14 जणांचा मृत्यू बिहारमध्येही निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या जवानांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे एका दिवसात 14 लोकांचा मृत्यू झाला. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (डीएमडी) जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्वाधिक मृत्यू भोजपूरमध्ये झाले आहेत. तिथे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यानंतर रोहतासमध्ये तीन, कैमूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

ओडिशात 9 अन् मध्य प्रदेशात 2 ठारओडिशातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, उष्णतेशी संबंधित आजारामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 54 झाली आहे. ओडिशात शुक्रवारी उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 45 होती. 54 मृत्यूंपैकी 20 पश्चिम ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यात आणि 15 संबलपूरमध्ये झाले. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यब्रत साहू यांनी सांगितले की, 15 मे पासून उष्णतेच्या लाटेमुळे 96 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातदेखील उष्णतेच्या लाटेमुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024VotingमतदानSun strokeउष्माघातHeat Strokeउष्माघात