शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

2019ची निवडणूक रेकॉर्डब्रेक जागांसह जिंकणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 04:53 IST

 पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली -  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जनतेला भक्कम आणि निर्णयक्षम सरकार हवे आहे. जे चांगली कामगिरी करू शकेल, असेही त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला ई मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मॉब लिंचिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. सध्या आसाममध्ये पेटलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "असमान आणि हताश झालेल्या परस्परविरोधी पक्षांच्या समुह म्हणजे महाआघाडी नव्हे तर राजकीय उतावळेपणा आहे. पुढच्या निवडणुकीत आपल्या कामाचा मंच विकास, वेगवान विकास आणि सर्वांचा विकास हा असेल. तसेच आमच्या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा निश्चितपणे अधिका जागा मिळतील. आम्ही याआधीचा विक्रम मोडीत काढू, असा मला विश्वास आहे." यावेळी मोदींनी एनआरसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्र सोडले. आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरून मतांचे राजकारण सुरू आहे. 1972 आणि 1982 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना एनआरसीची अंमलबजावणी टाळले गेले होते." असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण