UP Election 2017: वाराणसीत पुन्हा 'हर हर मोदी'चे नारे

By Admin | Updated: March 4, 2017 12:11 IST2017-03-04T11:23:03+5:302017-03-04T12:11:56+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील 'मेगा रोड शो'ला सुरुवात झाली आहे

UP Election 2017: slogan of 'Har Har Modi' again in Varanasi | UP Election 2017: वाराणसीत पुन्हा 'हर हर मोदी'चे नारे

UP Election 2017: वाराणसीत पुन्हा 'हर हर मोदी'चे नारे

ऑनलाइन लोमकत
वाराणसी, दि. 4 - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावला असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमधील 'मेगा रोड शो'ला सुरुवात झाली आहे. वाराणसीतून लोकसभेवर निवडून गेलेल्या मोदींनी प्रचारात कोणीतीही कसर बाकी ठेवलेली नाही. शनिवारी सकाळी वाराणसीत येताच मोदींनी प्रथम पं. मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली. ओपन जीपमधून लोकांच्या भेटीस आलेल्या मोदींना पाहण्यासाठी चहुबाजूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी  झाली. 'हर हर मोदी, घर घर मोदी'च्या घोषणा देत लोकांनी त्यांचे स्वागत केले. थोड्याच वेळात मोदी काळभैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ येथे जाऊन दर्शन घेणार आहेत असून तेथेच त्यांची पहिली सभा होणार आहे.  

दरम्यान मोदी यांच्या या वेळातच मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचाही रोड शो होणार असल्याने मोठ्या वाहतूक कोडींची शक्यता व्यक्त होत आहे. 

Web Title: UP Election 2017: slogan of 'Har Har Modi' again in Varanasi