तुरुंगातून निवडून आला, आता त्याचे वडील पक्ष काढणार; खलिस्तानी अमृतपाल राजकारणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:48 IST2025-01-03T09:48:17+5:302025-01-03T09:48:38+5:30
अमृतपाल हा वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख आहे. पोलीस ठाणे उध्वस्त केल्याच्या प्रकरणापासून तो वॉन्टेड होता.

तुरुंगातून निवडून आला, आता त्याचे वडील पक्ष काढणार; खलिस्तानी अमृतपाल राजकारणी होणार
आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात असलेला खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंग याच्या वडिलांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. येत्या १४ जानेवारीला पंजाबमध्ये ते या पक्षाची स्थापना करणार आहेत. तरसेम सिंग यांनी सांगितले की माघीच्या मुहूर्तावर मुक्तसर जिल्ह्यात याची स्थापना केली जाणार आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर अमृतपाल सिंग या पक्षाचे नेतृत्व करणार आहे.
अमृतपाल हा वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख आहे. पोलीस ठाणे उध्वस्त केल्याच्या प्रकरणापासून तो वॉन्टेड होता. लोकसभा निवडणुकीत त्याने अपक्ष निवडणूक लढविली होती. खडूर साहिब मतदारसंघातून तो निवडणूक जिंकला आहे. तुरुंगात असूनही तो निवडून आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार तो आसामच्या तुरुंगात आहे.
अमृतपाल सिंग व त्याच्या समर्थकांनी २३ फेब्रुवारी २०२३ ला अजनाला पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्रे घेऊन घुसले होते. बॅरिकेड्स तोडून तलवारी आणि बंदुका हवेत फिरविल्या होत्या. एका सहकाऱ्याला सोडविण्यासाठी पोलिसांसोबत धक्काबुक्की केली होती.