शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने त्याच मंदिराला दिली अडीच लाख रूपयांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 11:29 IST

मंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे.

ठळक मुद्देमंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे.एका वृद्ध महिलेने मंदिराच्या बाहेर भीक मागून चक्क अडीच लाख रूपयांची देणगी मंदिराला दिली आहे. 

म्हैसूर- मंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे. तेथील एका वृद्ध महिलेने मंदिराच्या बाहेर भीक मागून चक्क अडीच लाख रूपयांची देणगी मंदिराला दिली आहे. 

एमव्ही सितालक्ष्मी (वय 85) असं या महिलेचं नाव असून गेल्या दहा वर्षापासून ही महिला घरगुती कामं करू शकत नव्हती. घरातील काम करू शकत नसल्याने सितालक्ष्मी या म्हैसूरमधील प्रसन्ना अंजनेया स्वामी मंदिराच्या बाहेर बसलेल्या दिसू लागल्या. मंदिरा बाहेर बसून या वृद्ध महिलेने अडीच लाख रूपये कमावले व ते पैसे त्यांनी मंदिराला देणगी म्हणून दिले. मंदिरातील सुविधा सुधारण्यासाठी तसंच हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना प्रसाद देण्यासाठी या महिलेने अडीच लाख रूपयांची देणगी दिली. या महिलेने मंदिराला दिलेल्या योगदानामुळे मंदिरात येणारा प्रत्येक भाविक या महिलेचं कौतुक करतो आहे तसंच त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी जातो आहे. सितालक्ष्मी या त्यांचा भाऊ आणि वहिनीबरोबर राहत होत्या. पण त्यांना त्यांच्या भावावर अवलंबून राहायचं नव्हतं. घरातील काम करणं शक्य नसल्याने सितालक्ष्मी यांनी घर सोडून मंदिर गाठलं. दिवसभर त्या मंदिराच्या बाहेर बसून राहायचा. मंदिर प्रशासन सितालक्ष्मी यांची काळजी घेतं. 

गणपती उत्सवाच्या काळात सितालक्ष्मी यांनी मंदिराला तीस हजार रूपयाची देणगी दिली होती. तसंच काही दिवसांपूर्वी या महिलेने मंदिराला 2 लाख रूपये दिले. एकंदरीतच या वृद्ध महिलेने मंदिराला एकुण अडीच लाख रूपयांची देणगी दिली आहे. 

मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून मला मिळणारे पैसे मी बँकेत जमा केले. माझ्यासाठी देव सर्वकाही आहे. मंदिर प्रशासन माझी काळजी घेत असल्याने माझ्याकडे असल्याने माझ्याकडे असलेले पैसे मी मंदिराला देण्याचा निर्णय घेतला. मंदिरात काम करणारी राजेश्वरी मला आठवड्यातून एकदा आंघोळ करायला मदत करते. भक्तांनी मला दिलेले पैसे जर मी माझ्याजवळ ठेवले तर ते चोरी होण्याची भीती होती. म्हणून ते पैसे मी बँकेत ठेवायचा निर्णय घेतला. हनुमान जयंतीच्या दिवशी भक्तांना चांगला प्रसाद मिळावा हाच हेतू आहे, असं सितालक्ष्मी यांनी म्हंटलं. 

मंदिराच्या बाहेर बसणारी ही महिला इतरांपेक्षा वेगळी आहे. त्या कधीही मंदिरात येणाऱ्या भाविकांकडे पैसे देण्याचा आग्रह करत नाही, भक्त जे देतात त्याचाच त्या स्विकार करतात. या वृद्ध महिलेने अगदी उदार मनाने त्यांच्याकडील पैसे मंदिराला दिले. सितालक्ष्मी यांच्या या कामगिरीबद्दल आमदार वासू यांनी त्यांचा सत्कारही केला. भक्तांनीही सितालक्ष्मी यांच्या या कार्याला प्रोत्साहन देत त्यांना पैसे द्यायला सुरूवात केली. काही भक्त सितालक्ष्मी यांना 100 रूपयेसुद्धा देतात तसंच त्यांचा आशिर्वाद आवर्जून घेतात, असं मंदिर ट्रस्टचे चेअरमन एम.बसवराज यांनी सांगितलं. 

 

टॅग्स :TempleमंदिरMONEYपैसा