माकडाने फेकलेल्या विटांमुळे वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 04:44 IST2018-10-21T04:44:18+5:302018-10-21T04:44:28+5:30

बागपत जिल्ह्यातील टिकरी गावाजवळील जंगलात हवन करण्यासाठी लाकडे आणण्यास गेलेल्या एका वृद्धावर तेथील माकडाने विटा फेकून मारल्या.

Elderly death due to monkey wrought brick | माकडाने फेकलेल्या विटांमुळे वृद्धाचा मृत्यू

माकडाने फेकलेल्या विटांमुळे वृद्धाचा मृत्यू

मेरठ : बागपत जिल्ह्यातील टिकरी गावाजवळील जंगलात हवन करण्यासाठी लाकडे आणण्यास गेलेल्या एका वृद्धावर तेथील माकडाने विटा फेकून मारल्या. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्या वृद्धाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान तो मरण पावला.
पोलिसांनी या प्रकाराची नोंद अपघात म्हणून केली आहे; मात्र त्या वृद्धाच्या कुटुंबियांनी त्या माकडाविरुद्ध तक्रार केली असून, मनुष्यहत्येचा गुन्हा त्या माकडावर दाखल करावा, असा आग्रह धरला आहे. स्थानिक पोलिसांनी तो अमान्य केल्याने कुटुंबियांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. अधिकाºयांनाही आता माकडाविरुद्ध गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न पडला आहे. आपल्याकडील कायदे माणसांसाठी आहेत, जनावरांसाठी नाहीत. त्यामुळे त्या कायद्यान्वये प्राण्यांवर कारवाईही करता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Elderly death due to monkey wrought brick

टॅग्स :Monkeyमाकड