हरिविठ्ठल नगरात वृध्दाला बेदम मारहाण
By Admin | Updated: April 9, 2016 00:18 IST2016-04-09T00:18:19+5:302016-04-09T00:18:19+5:30
जळगाव : रस्त्यात वाहनाला अडथळा ठरणारी चिकनची गाडी बाजूला सरकावल्याचा राग आल्याने शेख रहेमान शेख चॉँद (वय ६०) या वृध्दाला अकबर सत्तार खाटकी व त्याच्या दोन भावांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता बेदम मारहाण केली. यात अकबरने डोक्यात लाकूड मारल्याने शेख रहेमान जबर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथून पोलिसांनी त्यांना वैद्यकीय मेमो देऊन उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. शेख यांच्या डोक्यात आठ ठिकाणी टाके पडले आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यांचा जाबजबाबही घेतला नाही किंवा तक्रारही दाखल केलेली नव्हती.

हरिविठ्ठल नगरात वृध्दाला बेदम मारहाण
ज गाव : रस्त्यात वाहनाला अडथळा ठरणारी चिकनची गाडी बाजूला सरकावल्याचा राग आल्याने शेख रहेमान शेख चॉँद (वय ६०) या वृध्दाला अकबर सत्तार खाटकी व त्याच्या दोन भावांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता बेदम मारहाण केली. यात अकबरने डोक्यात लाकूड मारल्याने शेख रहेमान जबर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथून पोलिसांनी त्यांना वैद्यकीय मेमो देऊन उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. शेख यांच्या डोक्यात आठ ठिकाणी टाके पडले आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यांचा जाबजबाबही घेतला नाही किंवा तक्रारही दाखल केलेली नव्हती.