शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला नसता; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:15 IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी मंगळवारी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुरू झाली.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सर्व राजकीय घटनाक्रमामध्ये घटनात्मक तरतुदींचे खुलेआम उल्लंघन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळीच १६ आमदारांना अपात्र घोषित करण्याची मुभा विधानसभा उपाध्यक्षांना दिली असती तर आज हा घटनात्मक पेच निर्माण झाला नसता, असा युक्तिवाद घटनापीठापुढे करतानाच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नियुक्तीवर व त्यांच्या नि:पक्षपातीवर जोरदार आक्षेप घेतला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी मंगळवारी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुरू झाली. नबाम रेबिया प्रकरणाच्या संदर्भात या खटल्याची सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करताना ठाकरे गटाकडून सिब्बल यांनी साडेतीन तासांच्या युक्तिवादात म्हटले की, शिंदे गटासारख्या फुटीर गटाला कोणताही संवैधानिक आधार नाही. लोकनियुक्त राज्य सरकारांना अभय द्यावयाचे असल्यास शिंदे गटासारख्या फुटीर कारवायांना आळा घालण्याची गरज आहे. तरच ही लोकशाही टिकून राहील.

न्यायाधीशांचे मत युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या १६ सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांनी सोडवावा, अशी सूचना केली. यावर कपिल सिब्बल यांनी तीव्र विरोध केला. 

सरन्यायाधीश : विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने किती हस्तक्षेप करावा, याला काही मर्यादा आहेत. सिब्बल : का नाही? अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फिरविला आहे. सरन्यायाधीश : मग अशा रीतीने कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही. उपाध्यक्षांवर तरी मग विश्वास कसा ठेवता येईल? सिब्बल : त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार होता.

आयोगाला आव्हान, सुनावणी आज शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात एका स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.  कपिल सिब्बल यांनी आजच यावर सुनावणी करून स्थगनादेश देण्याची मागणी केली. सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड म्हणाले, यासंदर्भात नेमके काय ते वाचावे लागेल. याचिकेच्या सुनावणीसाठी घटनापीठाचे काम थांबविता येणार नाही. यावर उद्या, बुधवारी सुनावणी करू.

 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय