जिओलॉजिकल सर्व्हे करून एक्स्प्रेस-वेचे सुरक्षेचे काम करणार एकनाथ शिंदे : खंडाळा घाटातील दरडीची केली पाहणी

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30

खालापूर : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या घटनास्थळी भेट दिली.

Eknath Shinde doing security work by doing geological surveillance: Surveillance in Khandala Ghat | जिओलॉजिकल सर्व्हे करून एक्स्प्रेस-वेचे सुरक्षेचे काम करणार एकनाथ शिंदे : खंडाळा घाटातील दरडीची केली पाहणी

जिओलॉजिकल सर्व्हे करून एक्स्प्रेस-वेचे सुरक्षेचे काम करणार एकनाथ शिंदे : खंडाळा घाटातील दरडीची केली पाहणी

लापूर : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खंडाळा बोरघाटात खंडाळा बोगद्याजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीची तसेच घटनास्थळावर सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी या घटनास्थळी भेट दिली.
सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील उपस्थित तंत्रज्ञांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या मार्गाला आता पंधरा वर्षे झाली असून येथील पावसाळी वातावरणामुळे दगडांची झीज होऊन ते सुटे झाले असल्याचे सांगितले. तसेच त्यामुळे दरडी कोसळत असल्याची वस्तुस्थिती असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी या भागाचा संपूर्ण भारतीय तसेच परदेशी तज्ज्ञांमार्फत जिओलॉजिकल सर्व्हे करण्यात येत आहे. हा मार्ग भविष्यात प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून युध्दपातळीवर काम करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
खंडाळा बोरघाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दरड कोसळल्यानंतर परदेशी तंत्रज्ञांच्या मदतीने येथे काम सुरू करण्यात आले असून या दरडग्रस्त परिसरामध्ये एक किलोमीटर अंतरात पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्याय म्हणून या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा येथून पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र .४ ने वळविण्यात आली असून खंडाळ्याच्या दस्तुरी येथे ती पुन्हा एक्स्प्रेस हायवेला जोडली आहे. तर एक्स्प्रेस हायवेवरील मुंबईहून पुण्याकडे येणार्‍या मार्गावरील दोन लेन पुण्याकडे जाणार्‍या वाहनांसाठी खुल्या ठेवून एक लेन मुंबईकडे जाणार्‍या अवजड तसेच इतर वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हीच व्यवस्था कायम ठेवण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीसचे अधीक्षक सुनील सोनावणे यांनी सांगितले.(वार्ताहर)

फोटो आहेत.

Web Title: Eknath Shinde doing security work by doing geological surveillance: Surveillance in Khandala Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.