UPSC Topper Akansh Dhull: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून, हरियाणाच्या पंचकुला येथील एकांश ढुल याने ऑल इंडिया रँक ३ मिळवून मोठं यश मिळवलं आहे. महत्त्वाचे म्हणजे, एकांशने सलग तिसऱ्यांदा ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण करण्याची किमया साधली असून, यंदा त्याने देशात तिसरे स्थान पटकावून आपली जिद्द दाखवून दिली.
अपयशातून घेतली यशाची मोठी झेप
एकांशचा हा प्रवास सोपा नव्हता. २०२१ मध्ये त्याने पहिल्यांदा ही परीक्षा दिली होती, तेव्हा तो मुख्य परीक्षेत अपयशी ठरला होता. मात्र, खचून न जाता त्याने स्वतःच्या चुकांमधून धडा घेतला. २०२३ मध्ये ३४२ वी रँक मिळवली. सध्या ते इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स सर्व्हिसमध्ये कार्यरत आहेत. २०२४ च्या परीक्षेत २९५ वी रँक मिळवली. २०२५ मध्ये अथक परिश्रमानंतर थेट देशात तिसरा क्रमांक पटकावला.
राजकीय वारसा पण स्वतःची वेगळी ओळख
एकांशचे वडील कृष्ण ढुल हे हरियाणा भाजपचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, एकांशने राजकारणाऐवजी प्रशासकीय सेवेची निवड केली. त्याची आई निर्मल ढुल या एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिका आहेत. एकांशच्या यशात आईचा मोलाचा वाटा असून त्यांनीच त्याला नागरी सेवांकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले होते.
नोकरी सांभाळून केली तयारी
सध्या भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेतील अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असताना एकांशने यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला होता. गेल्या आठ वर्षांपासून त्याने जे समर्पण दिले, त्याचे हे फळ आहे, अशा शब्दांत त्याच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला. एकांशने आपले शालेय शिक्षण चंदीगडमध्ये पूर्ण केले, तर दिल्लीच्या प्रतिष्ठित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली.
मुख्यमंत्री नायब सैनींकडून कौतुक
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी स्वतः फोन करून एकांशचे अभिनंदन केले. "एकांशसारख्या तरुणांचे यश हे विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नातील एक भक्कम आधारस्तंभ आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्याचे कौतुक केले.
Web Summary : Akansh Dhull secured All India Rank 3 in UPSC 2025 after previous attempts. Despite his father's BJP affiliation, Akansh chose civil service, inspired by his mother. He balanced his job with UPSC preparation, achieving success through dedication. Haryana's CM congratulated him.
Web Summary : आकांक्षा ढुल ने यूपीएससी 2025 में अखिल भारतीय रैंक 3 हासिल किया। उनके पिता भाजपा से हैं, फिर भी आकांक्षा ने अपनी मेहनत से सफलता प्राप्त की। आकांक्षा ने नौकरी के साथ यूपीएससी की तैयारी की और समर्पण से यह मुकाम हासिल किया। हरियाणा के मुख्यमंत्री ने उन्हें बधाई दी।