शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

तामिळनाडूतील बस डेपोच्या विश्रांतीगृहाचं छत कोसळून आठ जणांचा मृत्यू; तीन जणांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 1:19 PM

तामिळनाडूच्या बस डेपोतील विश्रातीगृहाच्या छताचा काही भाग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देतामिळनाडूच्या बस डेपोतील विश्रातीगृहाच्या छताचा काही भाग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चाळीस वर्ष जुनी ही बस डेपोची इमारत असून शुक्रवारी सकाळी या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला.

नागपट्टनम- तामिळनाडूच्या बस डेपोतील विश्रांतीगृहाच्या छताचा काही भाग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं.चाळीस वर्ष जुनी ही बस डेपोची इमारत असून शुक्रवारी सकाळी या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला.  तामिळनाडू राज्य परिवहन मंडळाची ही इमारत आहे. नागपट्टनम जिल्ह्यातील पोरयारमध्ये ही इमारत असून शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली. 

मृत्यू झालेले आणि जखमी हे बसचे चालक आणि वाहक आहेत. ड्यूटीनंतर इमारतीत ते आराम करत होते. मध्यरात्री साडेतीन वाजता इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मुनीयप्पन, चंद्रसेखर, प्रभाकर, रामालिंगमस मनीवन्नन, धनपाल, अन्बारसन आणि बाळू अशी मृतांची नावे आहेत. तर व्यकंटेशन, सेन्थिल आणि प्रेमकुमार अशी जखमींची नावं आहेत. त्यांना  नागपट्टनम सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पोरयार पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या नागपट्टनम आणि मइलादुथुराईमधील जवानांनी बचाव कार्य केलं. पोरयारमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस झाला त्यामुळे इमारत कमकुवत झाली, असं पोलिसांचं मत आहे. 

दरम्यान,मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी दुपारी मृत कर्मचाऱ्यांना साडेसात लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना दीड लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसंच मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांनी केली आहे.