शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

...हा तर लोकसेवेवर अहंकाराचा विजय; राज्यपालांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 9:56 AM

राज्यपालांची टीका दुर्दैवी असून, मुख्यमंत्री चोवीस तास जनसेवेत असतात, तसेच राज्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काम करतात, असा पलटवार सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने केला आहे.

कोलकाता : यास चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाट पाहायला लावल्याचा मुद्दा गाजत असतानाच, हा प्रकार म्हणजे लोकसेवेवर अहंकाराचा विजय आहे, अशी टीका राज्यपाल जगदीप धनखड यांनी केली आहे; तर राज्यपालांची टीका दुर्दैवी असून, मुख्यमंत्री चोवीस तास जनसेवेत असतात, तसेच राज्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काम करतात, असा पलटवार सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने केला आहे.राज्यपालांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी उपस्थित असतील, त्या सहभागी होणार नाहीत, असे त्यांनी आधीच संकेत दिले होते. या बैठकीत अधिकारी, धनखड यांच्याबरोबरच भाजप खा. देबश्री चौधरी यांची उपस्थिती होती.अधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंद्रीग्राम मतदारसंघात पराभव केला होता. पंतप्रधानांच्या बैठकीत भाजपच्या एखाद्या आमदाराचे काय काम आहे, असा सवाल ममतांनी केला होता. या बैठकीत राज्यपाल व अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित असण्यावर ममतांचा कसलाही आक्षेप नव्हता.तृणमूल काँग्रेस साेडून गेलेले घरवापसीच्या रांगेतपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमाेर पक्ष साेडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची लाट राेखण्याचे एक माेठे आव्हान हाेते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत माेठा विजय मिळवला आणि चक्र उलटे फिरू लागले. भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी रांगेत उभे आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून ममतांचे अनेक विश्वासू नेते भाजपमध्ये गेले. मात्र, २ मे राेजी मतमाेजणीनंतर चित्र पालटले. तृणमूल काँग्रेसने २९२ पैकी २१३ जागा जिंकून सत्ता कायम राखली. आता अनेक जण घरवापसीसाठी प्रयत्न करत असून त्यांनी ममतांना पत्र पाठवून पक्षात पुन्हा प्रवेश देण्याची विनंती केली आहे.राजीनामा दिलेले दासगुप्ता यांची राज्यसभेवर फेरनियुक्तीनवी दिल्ली : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे स्वपन दासगुप्ता यांना पुन्हा राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी सदस्यत्व बहाल केले आहे. दासगुप्ता यांनी एप्रिलमध्ये राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाली हाेती. दासगुप्ता यांनी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढविली हाेती. मात्र, ते त्यात पराभूत झाले. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या त्याच सदस्याची फेरनियुक्ती केल्याची ही दुर्मीळ घटना आहे. दासगुप्ता यांचा कार्यकाळ २४ एप्रिल २०२२ पर्यंत राहणार आहे. दासगुप्ता यांच्यासाेबतच महेश जेठमलानी यांचीही राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. रघुनाथ माेहपात्रा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली हाेती. जेठमलानी यांचा कार्यकाळ १७ जुलै २०२४ पर्यंत राहणार आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी