शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

‘ईडी’ची नुसतीच ‘काडी’!, १५ वर्षांत केवळ १४ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:41 IST

enforcement directorate : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली.

-  हरिश गुप्ता

नवी दिल्ली : एखाद्याच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून दिले की, त्याची पळता भुई थोडे होते. त्यात हे चौकशीचे शुक्लकाष्ठ ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालयाचे असेल तर मग काही बघायलाच नको... ‘ईडी’चा दरारा एवढा मोठा की, चौकशीसाठी बोलावणे आले की, समोरच्याच्या उरात धडकी भरते. असे असले तरी गेल्या १५ वर्षांत ‘ईडी’ ला केवळ १४ प्रकरणांतच आरोप सिद्ध करून दाखविण्यात यश आले आहे. तशी आकडेवारीच ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) २००५ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर ‘ईडी’ला अमर्याद अधिकार प्राप्त झाले. त्यानंतर ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये वाढ झाली. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा, माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम, भूपिंदरसिंह हुड्डा, अगुस्टावेस्टलँड, डी. के. शिवकुमार, व्हिडीओकॉन, आयसीआयसीआय, विजय मल्या, आयएनएक्स मीडिया, फारूक अब्दुल्ला, मेहुल चोक्सी इत्यादींना ‘ईडी’च्या चौकशीचा अनुभव आला आहे. अलीकडेच सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीमुळेही ‘ईडी’ चर्चेत होती. मात्र, असे असले तरी गेल्या १८ वर्षांतील आकडेवारी पाहता चौकशांच्या तुलनेत प्रकरण तडीस नेण्याच्या बाबतीत ‘ईडी’ कैक योजने दूर असल्याचे निष्पन्न होते. 

मोदी सरकारच्या कारकीर्दीत छाप्यांमध्ये वाढकाँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तुलनेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत ‘ईडी’च्या छाप्यांमध्ये उल्लेखनीय प्रमाणात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ‘ईडी’ने ९९ छापे टाकले होते. त्याचेच प्रमाण २०१९ मध्ये ६७० एवढे होते. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात ‘ईडी’ केवळ नऊ प्रकरणांतच दोषारोप सिद्ध करू शकली आहे. 

अपुरा कर्मचारीवर्ग कारणीभूतदोषारोप सिद्ध करण्याच्या कामात ‘ईडी’ला येत असलेल्या अपयशाचे एक कारण म्हणजे अपुरे मनुष्यबळ होय. ‘ईडी’मध्ये २००० लोकांची भरती करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात सद्य:स्थितीत केवळ ११०० कर्मचारीच ‘ईडी’मध्ये आहेत. त्यामुळे या अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम तपासावर होतो. दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत ‘ईडी’चे माजी संचालक कर्नाल सिंग यांनी व्यक्त केले आहे.‘ईडी’ची ही अवस्था पाहून ‘बहुत शोर सुनते थे पहलूं मे दिल का, जो चिरा तो कतरा-ए-खून ना निकला’ या १९व्या शतकातील शायर ख्वाजा हैदर अली आतिश यांच्या कांव्यपक्ती आठवतात.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय