शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भूपेश बघेलांच्या घरावर ED चा छापा, मोठी रोकड जप्त; नोटा मोजण्याची मशीन मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:02 IST

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीने छापा टाकला.

Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. ही रोकड मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन कॅश काऊंटिंग मशीन मागवल्या आहेत. अधिकाऱ्यांना भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत. 

हे प्रकरण मद्य घोटाळ्याशी संबंधित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य बघेल यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. आजपासूनच चौकशीची पहिली फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. चैतन्य बघेल यांच्याविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ईडीने छापे आणि कारवाई केली आहे. चैतन्यचा 2100 कोटी रुपयांच्या मद्य घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय आहे.

2019 ते 2022 दरम्यान 2,161 कोटींचे घोटाळे छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्याच्या तपासाला गती देण्यासाठी ईडीने आज चैतन्य बघेल आणि राज्यातील अन्य 14 ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई 2019 ते 2022 दरम्यान राज्यात झालेल्या सुमारे 2,161 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांना असे काही पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे संशयाची सुई चैतन्य बघेलकडे फिरत आहे. 

ED ने 2023 मध्ये तक्रार दाखल केललीअंमलबजावणी संचालनालयाने (ED) जुलै 2023 मध्ये या मद्य घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचे भाऊ अन्वर ढेबर, माजी IAS अधिकारी अनिल तुटेजा आणि छत्तीसगड स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (CSM) चे व्यवस्थापकीय संचालक अरुणपती त्रिपाठी यांसारख्या प्रमुख लोकांची नावे होती. एजन्सीने आरोप केला की, या लोकांनी घोटाळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये खरेदी प्रक्रियेत फेरफार करणे आणि निवडक मद्य उत्पादकांकडून कमिशन घेणे समाविष्ट आहे. कथित भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीचे 2,161 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाड