शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ED चे मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे; वॉशिंग मशीनमध्ये लपवला कोट्यवधीचा खजिना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 22:01 IST

शेल कंपन्यांच्या मदतीने 1800 कोटी रुपये सिंगापूरला पाठवल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

ED raid:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेमा प्रकरणात मॅक्रोनियन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला, संजय गोस्वामी आणि त्यांच्या इतर कंपन्यांवर छापे टाकले. या छापेमारीत 2.54 कोटी रुपये जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, जप्त केलेली रक्कम चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवण्यात आली होती. या छापेमारीत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

मुंबईसह या ठिकाणांवर छापेईडीने ज्या कंपन्यांवर छापे टाकले, त्यात लक्ष्मीटन मेरीटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टीवर्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एमएस भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. यासोबतच, कंपन्यांचे संचालक आणि भागीदार संदीप गर्ग आणि विनोद केडिया यांच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

भारताबाहेर विदेशी चलन पाठवल्याचा आरोपया संस्था मोठ्या प्रमाणावर भारताबाहेर परकीय चलन पाठवत असल्याची माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे. हे परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन आहे. गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूर आणि हॉरायझन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर, या दोन्ही परदेशी संस्था अँथनी डी सिल्वाद्वारे व्यवस्थापित केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. 

ईडीने 47 बँक खाती गोठवलीशेल कंपन्यांच्या मदतीने बनावट मालवाहतूक आणि इतर कामांच्या नावाखाली सिंगापूरस्थित संस्थांना 1800 कोटी रुपये दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ईडीने संबंधित संस्थांची 47 बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे आता कंपनीला कोणताही व्यवहार करता येणार नाही. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी ईडी जप्त केलेल्या कागदपत्रे आणि उपकरणे तपासत आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी