Money Laundering Case: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:54 AM2023-04-19T09:54:21+5:302023-04-19T09:54:47+5:30

Karti Chidambaram : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे.

ED attaches Karti Chidambaram's four properties worth Rs 11.04 cr, INX media case | Money Laundering Case: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

Money Laundering Case: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

googlenewsNext

नवी दिल्ली :  आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांची 11 लाख 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या चार मालमत्तेपैकी एक ही कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात असलेली स्थावर मालमत्ता आहे, असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. त्यांना सीबीआय आणि ईडी या दोन्हींकडून आयएनएक्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. ईडीने 2017 मध्ये आयएनएक्स मीडिया ग्रुपला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी देण्यात कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी पीएमएलएअंतर्गत फौजदारी खटला नोंदवला होता.

काय आहे प्रकरण? 
हे प्रकरण आयएनएक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून मिळालेल्या कथित अवैध पैशाशी संबंधित आहे. याप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. लंडनहून चेन्नई विमानतळावर परत येताच कार्ती चिदंबरम यांनाअटक करण्यात आली. या प्रकरणी कार्ती यांच्यावर  गुन्हा दाखल झाला होता. आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक गैरपद्धतीने आणण्यासाठी कार्ती चिदंबरम यांनी साडेतीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात म्हणजे पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्रीपदी असताना हा प्रकार घडला होता.
 

Web Title: ED attaches Karti Chidambaram's four properties worth Rs 11.04 cr, INX media case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.