शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

Prem Prakash Arrested : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना अटक; घरातून दोन एके-47 रायफल्स जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 09:19 IST

Prem Prakash Arrested : झारखंडमधील बेकायदेशीर खाण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने बुधवारी झारखंड, बिहार, तामिळनाडू, दिल्ली आणि एनसीआरमध्ये छापे टाकले.

झारखंडमधील अवैध खाणकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रेम प्रकाश यांना अटक केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी बुधवारी प्रेम प्रकाश यांच्या घरावर छापा टाकून दोन एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या होत्या. प्रेम प्रकाश हे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे जवळचे मानले जातात.

झारखंडमधील बेकायदेशीर खाण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने बुधवारी झारखंड, बिहार, तामिळनाडू, दिल्ली आणि एनसीआरमध्ये छापे टाकले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांचे जवळचे सहकारी बच्चू यादव यांच्या चौकशीनंतर हे छापे टाकण्यात आले. या प्रकरणी ईडीने दोघांना यापूर्वीच अटक केली आहे.

प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले. अवैध खाण घोटाळ्यात प्रेम प्रकाशचा सहभाग असल्याचा संशय आहे. छाप्यादरम्यान, ईडीने रांची येथील प्रेम प्रकाशच्या घरातून दोन एके 47 रायफल, 60 काडतुसे आणि दोन मासिके जप्त केली होती. दुसरीकडे, झारखंड पोलिसांनी दावा केला आहे की, प्रेम प्रकाश यांच्या घरी सापडलेल्या एके-47 रायफल्स दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या आहेत. या पोलिसांना आता निलंबित करण्यात आले आहे. 

दरम्यान, हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल रांची जिल्हा दलात काम करत होते. मात्र 23 ऑगस्ट रोजी ड्युटी संपवून ते घरी परतत असताना मुसळधार पावसामुळे काही वेळ प्रेम प्रकाश यांच्या घरी थांबले. तिथल्या काही कर्मचाऱ्यांशी त्याची ओळख झाली, म्हणून त्याने आपली रायफल कपाटात ठेवली आणि चावी घेऊन निघून गेले. त्यानंतर सकाळी दोन्ही कॉन्स्टेबल आपल्या रायफल्स घेण्यासाठी प्रेम प्रकाश यांच्या घरी आले, परंतु त्यांना तेथे ईडीचे छापे सुरू असल्याचे समजले. अशा स्थितीत त्यावेळी भीतीपोटी त्यांनी आपली रायफल घटनास्थळावरून घेतली नाही, अशीही माहिती मिळत आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी