शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये ईडीची पुन्हा कारवाई! पहाटे ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरावर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 08:44 IST

पश्‍चिम बंगालमध्ये ईडीने आज पहाटे दोन मंत्र्यांच्या घरावर छापा टाकला.

पश्चिम बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ईडी पथकाने आज पहाटे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या दोन्ही घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. हा छापा महापालिकेच्या नोकरी घोटाळ्याशी संबंधित आहे. ईडीची एक टीम अग्निशमन सेवा मंत्री सुजित बोस यांच्या दोन ठिकाणी पोहोचली आहे, तर दुसरी टीम मंत्री तपस रॉय यांच्या निवासस्थानी छापे टाकत आहे. तसेच या दोन मंत्र्यांशिवाय पालिकेच्या माजी उपाध्यक्षांच्या घरावरही ईडीचे छापे सुरू आहेत. 

काही दिवसापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक गेले होते, यावेळी गावकऱ्यांच्या जमावाने ईडी पथकावर हल्ला केला. जमावाने ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफ जवानांच्या वाहनांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल नवीन कोलकाता येथे पोहोचले होते. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना घाबरू नका, निर्भयपणे चौकशी करा, असे सांगितले होते. 

ईडी अधिकार्‍यांशी बैठक घेतल्यानंतर प्रभारी संचालकांनी सीएपीएफ दलाच्या सुरक्षा कर्मचार्‍यांशी समन्वय बैठक घेतली. बैठकीत, छाप्यांदरम्यान ईडी अधिकार्‍यांसह सीएपीएफच्या तैनातीची योजना तयार करण्यात आली. अधिकार्‍यांसोबतच महिला पोलिसांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून अडथळे निर्माण करणार्‍या महिलांना दूर करता येईल, असे मत कार्यकारी संचालक राहुल नवीन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliceपोलिस