शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

२०११पेक्षा २०१८मध्ये आर्थिक स्थिती अत्यंत वाईट; काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 6:26 AM

देशभरात महागाई व पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात जनआक्रोश सुरू असताना सरकारने मात्र इंधन दरवाढीवरून हात वर केले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात महागाई व पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात जनआक्रोश सुरू असताना सरकारने मात्र इंधन दरवाढीवरून हात वर केले आहेत. दरवाढीचे नियंत्रण आमच्या हाती नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भाव वाढत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला २१ पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर सोमवारी देशभरात लोक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी बंद शांततेत पाळला गेला तर काही ठिकाणी हिंसक वळण मिळाले. या बंदच्या आयोजनात विरोधी पक्षांची दिसलेली एकजूटही तेवढीच महत्त्वाची ठरली.विरोधकांच्या आरोपांच्या विरोधात सरकारचा बचाव करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविण्यात आले.मोदी सरकार अनेक विकास योजना राबवत असून त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर पेट्रोल, डिझेलच्या किमतीतील चढ-उतार अवलंबून असतात, असे सांगून त्यांनी या किमती कमी करण्याबाबत हात वर केले.पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील याबाबत धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी चर्चा केली.>या पक्षांची मिळाली साथकाँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, जनता दल (सेक्युलर), बसपा, राजद, भाकप, माकप, एआयडीयूएफ, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, द्रमुक, टीएमसी, आम आदमी पार्टी, पीडीपी, केरळ काँग्रेस, आरएफसी, आययूएमएल, लोकतांत्रिक जनता दल, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, हिंदुस्थान आवाम पार्टी आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता.>देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकलेआहेत, मात्र पंतप्रधान नेहमीप्रमाणे सोयीस्कररीत्या गप्प बसले आहेत. ते कोणत्या जगात राहतात, हेच समजत नाही. - राहुल गांधी>देशभर जनतेच्या मनात रोष उत्पन्न झाला आहे. हे सरकार जनविरोधी आहे, हे लोकांना पटवून देण्याची जबाबदारी सर्व विरोधी पक्षांवर आहे. केंद्रातले सत्तांतर त्यामुळेच घडेल. - शरद पवार>आता जनतेची सहनशक्ती संपत आली असून हे अप्रिय सरकार बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. - मनमोहन सिंग>राजस्थाननंतर आंध्र प्रदेश सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये प्रति लीटर २ रुपये कपात केल्याची घोषणा केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारBharat Bandhभारत बंद