श्रीमंत व गरीब यांच्यातील आर्थिक दरी घटली; भारत ठरला चौथा सर्वात जास्त समानतेचा देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:13 IST2025-07-07T12:10:34+5:302025-07-07T12:13:29+5:30
देशातील विकासाचे फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असल्याने भारत आता जगातला चौथा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे.

श्रीमंत व गरीब यांच्यातील आर्थिक दरी घटली; भारत ठरला चौथा सर्वात जास्त समानतेचा देश
नवी दिल्ली : देशातील विकासाचे फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असल्याने भारत आता जगातला चौथा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या यादीत भारत १६७ देशांपेक्षा वर आहे, आणि स्लोवाक रिपब्लिक, स्लोव्हेनिया आणि बेलारूसपेक्षा खाली आहे. भारताचा ‘गिनी इंडेक्स’ २५.५ असून, तो देशातील असमानता कमी झाल्याचे दर्शवतो. हा स्कोअर चीन (३५.७), अमेरिका (४१.८) आणि जी७ आणि जी२० देशांपेक्षा चांगला आहे.
सर्वात कमी असमानता असलेले देश कोणते?
स्लोव्हाकिया २४.१
स्लोव्हेनिया २४.३
बेलारूस २४.४
भारत २५.५
आर्मेनिया २५.६
यूएई २६.०
आइसलँड २६.१
अझरबैजान २६.६
युक्रेन २६.६
बेल्जियम २७.२
सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेले देश?
दक्षिण आफ्रिका ६३
नामिबिया ५९.१
सुरिनाम ५७.९
झांबिया ५७.१
साओ टोमे आणि प्रिन्सिपे ५६.३
सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिक ५६.२
इस्वातिनी ५४.६
मोझांबिक ५४
ब्राझील ५३
कोलंबिया ५१.५
भारतासमोर आव्हाने काय?
भारतात काही क्षेत्रांमध्ये आणि समुदायांमध्ये अजूनही असमानता कायम आहे. ग्रामीण आणि शहरी भागात किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजूनही मोठी आर्थिक दरी आहे. पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अजूनही २९ टक्के आहे.