West Bengal: तारीख ठरली! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 05:56 PM2021-09-04T17:56:19+5:302021-09-04T17:57:09+5:30

West Bengal: ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी सहा महिन्यात पुन्हा निवडून येणे महत्त्वाचे आहे.

ec declares schedule for 4 bypoll in west bengal including mamata banerjee announced bhabanipur | West Bengal: तारीख ठरली! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार

West Bengal: तारीख ठरली! पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘खेला होबे’ होणार; ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार

Next

कोलकाता: काही महिन्यांपूर्वी देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये पश्चिम बंगालचीनिवडणूक सर्वांत लक्ष्यवेधी ठरली. भाजपला तगडी टक्कर देत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून पराभव केला. ममता बॅनर्जी यांना सहा महिन्यात निवडून येणे आवश्यक आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघाची निवड निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. येथील विद्यमान आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. (ec declares schedule for 4 bypoll in west bengal including mamata banerjee announced bhabanipur)

“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार

ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी सहा महिन्यात पुन्हा निवडून येणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचे बोलले जात होते. यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. या ठिकाणी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते काजल सिन्हा यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक निकालापूर्वी सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र, जनतेने कौल दिल्यामुळे निवडणूक निकालात ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आता खरदह येथील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर शोभनदेव चट्टोपाध्याय यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

PM मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; तालिबान, चीनसह अनेक मुद्द्यांवर बायडेन यांच्याशी चर्चा!

चार ठिकाणी पोटनिवडणूक होणार

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तसेच मतमोजणी ०३ ऑक्टोबर रोजी केली जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

“आम्हाला अडवू नका, परिणाम चांगले होणार नाहीत”; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

दरम्यान, २०११ च्या विधानसभा निवडणुकीतही ममता बॅनर्जी विधासभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हाही त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. सुब्रत बख्शी यांनी त्यांच्यासाठी भवानीपूरची जागा सोडली होती. त्यानंतर ममता दीदींनी सीपीएमच्या नंदिनी मुखर्जी यांना ९५ हजार मतांनी पराभूत केले होते. २०१६ च्या निवडणुकीतही ममता दीदी याच मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. तेव्हा त्यांचे विजयी अंतर कमी झाले होते. तेव्हा त्यांनी काँग्रेस उमेदवार दीपा यांना २५,३०१ मतांनी पराभूत केले होते. 
 

Web Title: ec declares schedule for 4 bypoll in west bengal including mamata banerjee announced bhabanipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.