एबोलाचा पहिला संशयित रुग्ण चेन्नईत
By Admin | Updated: August 10, 2014 14:04 IST2014-08-10T14:04:02+5:302014-08-10T14:04:15+5:30
पश्चिम आफ्रिकेत एबोला वेगाने फैलावत असतानाच भारतातही एबोलाचा संशयित रुग्ण आढळला आहे. आफ्रिकेतील न्यू गिनीतून चेन्नईत परतलेल्या भारतीयाला एबोलाची लागण झाल्याचा संशय आहे.

एबोलाचा पहिला संशयित रुग्ण चेन्नईत
ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. १० - पश्चिम आफ्रिकेत एबोला वेगाने फैलावत असतानाच भारतातही एबोलाचा संशयित रुग्ण आढळला आहे. आफ्रिकेतील न्यू गिनीतून चेन्नईत परतलेल्या भारतीयाला एबोलाची लागण झाल्याचा संशय आहे. रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
चेन्नईतील थेनी या गावात राहणारा २५ वर्षीय तरुण शनिवारी आफ्रिकेतील न्यूगिनी येथून भारतात परतला. रात्री नऊ वाजता एमिरात एअरलाइन्सच्या विमानाने हा तरुण चेन्नई विमानतळावर उतरला. मात्र यानंतर त्याला ताप आला आणि डोकेदुखीचा त्रास सुरु झाला. रात्री दीडच्या सुमारास त्याला चेन्नईतील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला ठेवण्यात आलेला वॉर्ड रिकामा करण्यात आला असून डॉक्टर,नर्स आणि वॉर्डबॉय यांना संपूर्ण शरीर झाकल्याशिवाय वॉर्डमध्ये प्रवेश दिला जात नाही. 'या रुग्णालाया एबोलाची लागण झाल्याचा संशय आहे. अद्याप त्याला एबोला झाल्याचे स्पष्ट झालेले नाही' असे रुग्णालय प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.