इबोला; आत्तार्पयत 10, 194 प्रवाशांची केली तपासणी
By Admin | Updated: August 19, 2014 01:22 IST2014-08-19T01:22:03+5:302014-08-19T01:22:03+5:30
इबोला या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधाकरिता देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणा:या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली

इबोला; आत्तार्पयत 10, 194 प्रवाशांची केली तपासणी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रत खळबळ उडवून दिलेल्या इबोला या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधाकरिता देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणा:या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात असून आतार्पयत 1क्,194 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ज्या विमानतळांवर ही तपासणी केली जात आहे त्यात दिल्लीसह चेन्नई, त्रिवेंद्रम, कोलकाता, मुंबई, बंगळुरू व कोच्ची या विमानतळांचा समावेश आहे.
या तपासणीअंती नायजेरियाच्या दोन प्रवाशांना डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले गेले मात्र त्यांचा तपासणी अहवाल नकारात्मक आला. दिल्लीच्या विमानतळावर एक विशेष केंद्र स्थापन केले असून तिथे ज्या प्रवाशांबाबत इबोलाची लागण झाल्याचा संशय वाटतो त्यांना ठेवले जाणार आहे. या केंद्रात एकूण 267 प्रवाशांना देखरेखीत ठेवले असून त्यात बहुतांशी महाराष्ट्र, केरळ व तामिळनाडूचे रहिवासी आहेत. इबोलाची लक्षणो व चिन्हांबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता व जागरुकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आतार्पयत इबोलाची 2127 प्रकरणो नोंदविली असून या आजाराने 1145 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दक्षता.. इबोलाने थैमान घातलेल्या पश्चिम आफ्रिकी देशांत 45 हजार भारतीय नागरिक वास्तव्याला आहेत. या पाश्र्वभूमीवर देशात इबोलाचा शिरकाव होऊ नये म्हणून सरकारने विदेशातून येणा:या प्रवाशांची विमानतळावर आरोग्य तपासणी सुरू केली असून यासाठी विमानतळावर आरोग्य पथके तैनात केली आहेत. आतार्पयत अनेक नागरिकांचा बळी गेल्याने इबोलाचे संकट जागतिक संकट बनले आहे.
विषाणूचा प्रवेश टळला ?
4अबुधाबी: कर्करोगावरील उपचारासाठी भारतात येणारी नायजेरियाची 35 वर्षीय महिला विमानतळावर मरण पावली. तिला इबोला या जीवघेण्या विषाणूंची लागण झाल्याची लक्षणो आढळून आल्याचे अबुधाबीच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. ही महिला भारतात येण्यापूर्वीच मृत्यूमुखी पडल्यामुळे इबोला विषाणूचा भारतातील प्रवेश थोडक्यात टळला.
4अॅडव्हान्स मेटास्टॅटिक कॅन्सरच्या उपचारासाठी ही महिला भारतात जात असताना येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाकडे जाण्याच्या बेतात असतानाच तिची तब्येत बिघडली. तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करूनही तिला वाचविता आले नाही. ती बेशुद्ध पडली होती. वैद्यकीय तपासणीत तिला ‘इबोला’ या जीवघेण्या विषाणूची लागण झाल्याची लक्षणो आढळली. तिचे पती आणि तिच्यावर उपचार करणा:यांना तिच्या मृत्यूचा अहवाल येईर्पयत संसर्गरोधी कक्षात ठेवण्यात आले आहे.