आंबेगावच्या पूर्व भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:05+5:302015-08-18T21:37:05+5:30

लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.

In the eastern part of Ambegaon, we celebrate Independence Day | आंबेगावच्या पूर्व भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

आंबेगावच्या पूर्व भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

णी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.
येथील ढोबळेवाडी, जारकरवाडी, लोणी, धामणी, मांदळवाडी वडगावपीर, देवगाव, काठापूर, लाखणगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, पहाडदरा, शिरदाळे रानमळा, झापवस्ती आदी गावात जि. प. प्राथमिक शाळांमधील व माध्यमिक शाळेतील मुलांनी घोषणा देत गावातून प्रभातफेरी काढली. ग्रामपंचायतीसमोर व शाळेमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
लोणी येथे सरपंच सावळेराम नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी उपसरपंच दिलीप आदक, माजी उपसरपंच गणेश गायकवाड, माजी सरपंच उद्धा्राव लंके, बाळशीराम वाळूंज, भगवान शिनलकर, बाळासाहेब वाळूंज,त उर्मिलाताई धुमाळ, ग्रामसेविका ज्योतीवेताळ तलाठी राणे आदी उपस्थित होते.
धामणी येथे सरपंच मंगल घोलप यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. पाणलोटाचे धामणीत १ कोटी ७० लाख रुपयांचे कामे सुरू असल्याचे सांगितले. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
फोटो ओळ : धामणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत व जि. प. प्राथमिक शाळेला १५ ऑगस्टच्या निमित्ताने आयएसओ २००८ हे मानांकन पत्र प्रदान करताना मान्यवर.

Web Title: In the eastern part of Ambegaon, we celebrate Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.