मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के, देशातील अनेक शहरांमधील जमीन हादरली; चार देशांमध्ये भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:35 IST2025-02-28T09:15:00+5:302025-02-28T09:35:05+5:30
Earthquake : भारतातील अनेक राज्यांमध्ये रात्री उशिरा २.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. कालच आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

मध्यरात्री पुन्हा भूकंपाचे धक्के, देशातील अनेक शहरांमधील जमीन हादरली; चार देशांमध्ये भूकंप
मध्यरात्री भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी उशिरा बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू नेपाळमधील सिंधुपालचौक असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे पहाटे २.३६ वाजता ६.१ तीव्रतेने पृथ्वी हादरली, हे धक्के अनेक राज्यांमध्ये जाणवले.
मिळेलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर, बिहारमधील पाटणा, सिलीगुडी, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि सिक्कीममध्ये इमारती आणि छतावरील पंखे हादरताना दिसले. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भारतातील भूकंपाच्या तीव्रतेची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्री भारतासह अन्य देशातही भूकंपाचे धक्के जाणवले. तीन तासांत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानच्या पाकिस्तानातही पहाटे ५.१४ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी होती. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू रावळपिंडीपासून आठ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता.
गेल्या काही दिवसांत भारताच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी देखील आसाममध्ये पहाटे २.३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यापूर्वी १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली एनसीआर तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.