Earthquake shocks India- Pakistan border | पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी
पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी

नवी दिल्ली: भारत- पाकिस्तानच्या सीमारेषेवर भूकंपाचे मोठे धक्के बसल्याचे समोर आले आहे. यासोबतच दिल्ली आणि उत्तर भारतात देखील भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भूकंपाचे धक्के बसल्याने तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 19 जणांचा मृत्यू तर 300 नागरिक जखमी झाल्याचे समजते आहे. दिल्ली- एनसीआरसह उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आज (मंगळवारी) दुपारी 4 वाजून 31 मिनिटाच्या आसपास भूकंपाचे धक्के बसले आहे. त्याचप्रमाणे या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील रावळपिंडीमद्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि रामबनमधील काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.


Web Title: Earthquake shocks India- Pakistan border
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.