शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

यादव कुटुंबात भूकंप! स्वार्थी महिलेने माझे... प्रतीक यादव देणार अपर्णा यादव यांना घटस्फोट; इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:12 IST

Prateek Yadav Aparna Yadav Divorce: अपर्णा यादव सध्या उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. त्या भाजपच्या सक्रिय नेत्या असून मुलायमसिंह यांच्या निधनापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

लखनौ: उत्तर प्रदेशातील सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या यादव कुटुंबातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक यादव यांनी त्यांची पत्नी आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांना घटस्फोट देण्याची घोषणा केली आहे. प्रतीक यादव यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावूक आणि संतापजनक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

"स्वार्थी महिलेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले" प्रतीक यादव यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अपर्णा यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले की, "मी या स्वार्थी महिलेला लवकरात लवकर घटस्फोट देणार आहे. तिने माझ्या कुटुंबातील नातेसंबंध खराब केले आहेत. तिला फक्त प्रसिद्धी आणि सत्तेची हाव आहे. सध्या माझी मानसिक स्थिती अत्यंत खराब आहे, पण तिला त्याचे काहीच पडलेले नाही."

प्रतीक यांनी पुढे म्हटले की, "मी इतकी वाईट प्रवृत्ती असलेली स्त्री कधीच पाहिली नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे मी तिच्याशी लग्न केले." ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अपर्णा यादव यांची भूमिका काय?अपर्णा यादव सध्या उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. त्या भाजपच्या सक्रिय नेत्या असून मुलायमसिंह यांच्या निधनापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रतीक यांच्या या खळबळजनक पोस्टनंतर अद्याप अपर्णा यादव यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच यादव कुटुंबातील इतर सदस्यांनीही या विषयावर मौन पाळले आहे.

प्रतीक आणि अपर्णा यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. अनेक वर्षे सुखी संसार केल्यानंतर अचानक अशा पद्धतीने घटस्फोटाची चर्चा समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yadav Family Drama: Prateek Yadav to Divorce Aparna; Instagram Post Shocks

Web Summary : Prateek Yadav announced his divorce from Aparna Yadav via Instagram, accusing her of being selfish and ruining family relations. He expressed distress over her alleged ambition for fame and power, while Aparna has yet to respond. The couple married in 2011.
टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादव