शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:28 IST

नितीश कुमार त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवतील आणि मुख्यमंत्रिपद भाजपाला देतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

पटना - बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे वळण येणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गुरुवारी ते राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याने बिहारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत. यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हेदेखील उपस्थित राहतील. 

नितीश कुमार त्यांचा मुलगा निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवतील आणि मुख्यमंत्रिपद भाजपाला देतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे. नितीश कुमार यांनी ट्विट करून राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. नितीश कुमार म्हणाले की, मागील २ दशकाहून अधिक काळ माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला, माझ्यासोबत उभे राहिले. त्याच जोरावर मी बिहारच्या लोकांची सेवा केली. तुमचा विश्वास आणि पाठिंबा यावर बिहार आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. संसदीय जीवनाची सुरुवात करताना माझ्या मनात एक इच्छा होती. बिहारच्या विधिमंडळासोबत मला संसदेतील दोन्ही सभागृहाचा सदस्य व्हायचे होते. त्यामुळे यंदा होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मी सदस्य बनू इच्छितो असं त्यांनी सांगितले.

तसेच मी पूर्ण प्रामाणिकपणे विश्वासही देतो, तुमच्याशी भविष्यातही तितकाच संबंध कायम ठेवेन. तुमच्या साथीने विकसित बिहार बनवण्याचा संकल्प कायम आहे. राज्यात जे नवे सरकार बनेल त्यांना माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन देत राहीन असा विश्वासही नितीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. 

४ महिन्यातच नितीश कुमारांचा राजीनामा?

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर २० नोव्हेंबरला नितीश कुमार यांनी पटना येथे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.  बिहारमध्ये १० वेळा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. बिहारमध्ये दीर्घ काळ त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र आता ४ महिन्यानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसते. ४ महिन्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देऊन राज्यसभेवर जात असल्याची घटना घडत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Politics Shaken: Nitish Kumar to Rajya Sabha, New Government?

Web Summary : Bihar's CM Nitish Kumar may go to Rajya Sabha, sparking questions about a new government. He expressed desire to serve in both houses of Parliament. Speculation suggests his son could be Deputy CM, BJP, CM.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा