शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

घरबसल्या मालामाल होण्याची सुवर्णसंधी! 1 रुपयाची नोट मिळवून देणार तब्बल 45 हजार; जाणून घ्या, कुठे आणि कसं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 9:47 AM

Earning 45 Thousand Rupees From 1 Rs Old Note : 1 रुपयाची नोट विकून तुम्हाला हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी आहे. भारत सरकारकडून ही एक रुपयाची नोट चलनातून बंद करण्यात आली असली, तरी आता मात्र बाजारात याची किमत हजारोंच्या घरात आहे.

नवी दिल्ली - जुनी नाणी, नोटा जपून ठेवायची अनेकांना आवड असते. विविध प्रकारचे कॉईन्स आणि नोटा जमवण्याचा अनेकांना छंद असतो. सध्या पैशाचे व्यवहार करतान नोटा या हमखास वापरल्या जातात. नाणी जास्त वापरली जात नाहीत. मात्र आता अवघ्या एक रुपयाची नोट तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देणार आहे. 1 रुपयाची नोट विकून तुम्हाला हजारो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी आहे. भारत सरकारकडून ही एक रुपयाची नोट चलनातून बंद करण्यात आली असली, तरी आता मात्र बाजारात याची किमत हजारोंच्या घरात आहे. 

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 1 रुपयाच्या नोटेची तब्बल 45 हजार रुपयांना विक्री होत आहे. मात्र या नोटवर 1957 मध्ये गव्हर्नर एचएम पटेल यांची सही असायला हवी. तसेच या नोटेचा सिरीयल नंबर 123456 आहे. या एक रुपयाच्या नोटेची Coinbazzar वेबसाईटवर विक्री होत आहे. येथे जुन्या 1 रुपयाच्या बंडलची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर वेबसाईटने किंमत 44,999 रुपये इतकी ठरवली आहे. यासाठी या वेबसाईटच्या शॉप सेक्शनमध्ये (Shop Section) जावं लागेल. त्यानंतर "नोट बंडल" कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर येथे संपूर्ण डिटेल्स पाहायला मिळतील.

26 वर्षांपूर्वी भारत सरकारने ही एक रुपयाची नोट चलनातून बंद केली होती. 1 जानेवारी 2015 मध्ये याची छपाई पुन्हा सुरू झाली. अनेकांकडे या नोटा अद्यापही आहेत. ज्या वर्षातील नोट हवी आहे, ती येथे खरेदी करता येऊ शकते. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक नोट अशीही आहे, जी भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीची आहे आणि याची बोली सात लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे. अशाप्रकारच्या जुन्या नोटा तुमच्याकडेही असतील, तर तुम्हीही मोठी रक्कम कमावू शकता. अनेक वर्षांपूर्वीची 1, 10, 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची ऑनलाईन बाजारात हजारो-लाखोंमध्ये विक्री होत आहे.

कुठे आणि कसं विकायचं नाणं?

जुनी नाणी किंवा नोटांच्या लिलावासाठी तुम्ही OLX प्लॅटफॉर्मवर चेक करू शकता. येथे जुन्या नोटांची विक्री होते. या प्लॅटफॉर्मवर लॉगइन आयडी बनवावा लागेल. लिलावासाठी तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो देखील शेअर करावा लागेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही पोस्टमध्ये India Mart वर देखील अशा प्रकारचा लिलाव होत असल्याचं म्हटलं आहे. मात्र इंडिया मार्टने अशा प्रकारचा कुठलाही लिलाव आपल्या साईटवर होत नसल्याची माहिती दिली आहे. अनेक लोक अँटिक सामानाचीही खरेदी करतात. तर काही लोकांना जुन्या नोटांचा संग्रह करण्याची आवड असते. ते अशा नोटांचा शोध घेत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MONEYपैसाbusinessव्यवसाय