शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:22 IST

शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले आहे.

नवी दिल्लीः सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर चीनचा बहिष्कार केला पाहिजे. आपली सेना देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं बाबा रामदेव म्हणाले आहे. आज तकच्या ई-अजेंटा सुरक्षा सभा या कार्यक्रमात ते बोलत होते. कारण चीन आपल्या देशांत 15 ते 20 लाख कोटींचा व्यवसाय करतो. टॉयलेट सीटपासून खेळण्यांपर्यंत चीनची उत्पादनं आपल्याकडे आयात केली जातात, असंही बाबा रामदेवांनी सांगितलं आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे ठराव करावे लागतील. मी गेल्या तीन दशकांत कोणतेही चिनी उत्पादन वापरलेले नाही. जर चीनला धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयानं चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारत-चिनी भाऊ-भाऊचा नारा दिला जात असून, चीन आपल्याला लुटत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही, तर त्याच्याविरोधात द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावे लागेल.चीनमधून आयात आणि निर्यातीच्या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबरोबरच आपण देशी वस्तूंसाठीही धोरण तयार केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय करारांशी बांधील आहेत. पंतप्रधानांनी राजकीयदृष्ट्या काय केले पाहिजे ते करत आहेत. पण भारताला चीनचा पर्याय बनवण्यासाठी देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी यांच्या उत्पादनाचे केंद्र बनवावे लागेल. पतंजली देशात मोठी कंपनी तयार करण्यात आली असून, वेगवेगळी उत्पादने बनवते. देशात इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांना यापूर्वी स्वत: ला स्वदेशी म्हणायला लाज वाटत होती. हे सर्व लोक आज अभिमानाने स्वदेशी म्हणत आहेत. चीनसमोर उभे राहण्यासाठी, संपूर्ण कृती योजना तयार करावी लागेल आणि त्या समान सामग्री तयार करावी लागेल.बाबा रामदेव यांनी सरकारला तीन सूचना दिल्या१. बाबा रामदेव म्हणाले की, चीनविरुद्ध उभे राहण्यासाठी सरकारने विशेष आर्थिक विभाग तयार करावा किंवा देशातील कुठल्याही कंपनीला चीनचा पर्याय म्हणून वस्तू बनवायच्या असतील तर सरकारने त्यास सूट दिली पाहिजे.२. बाबा रामदेव यांनी सरकारला आणखी एक सूचना दिली की, चीनमधून येणा-या सर्व उत्पादनांवर करात प्रचंड वाढ केली पाहिजे, जेणेकरून लोक तिथून सामान आणण्याबद्दल बर्‍याचदा विचार करतील.३. बाबा रामदेव म्हणाले की, सर्व सरकारी यंत्रणेने संयुक्तपणे असे वातावरण तयार केले पाहिजे की भारतातील लोक जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादने बनवू शकतील आणि लोक ते वापरू शकतील. जपान, दक्षिण कोरियासह बर्‍याच देशांमध्ये या प्रकारचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा