शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

राजकारणातील घराणेशाही देशापुढील आव्हान, मूळापासून उच्चाटन होणं आवश्यक : पंतप्रधान मोदी

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 12:23 PM

अजून अनेक बदल शिल्लक, ते तरूण वर्गालाच पूर्ण करायचे आहेत; मोदींचं आवाहन

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला केलं संबोधितआडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चाललेत, मोदींचं वक्तव्य

"आज राजकारणात प्रामाणिक लोकांना संधी मिळत आहे. प्रामाणिकपणा आणि कामगिरी ही आजच्या राजकारणाची पहिली अनिवार्य अट असणार आहे. भ्रष्टाचार ज्यांचा वारसा होता तोच भ्रष्टाचार आज त्यांच्यावरील ओझं बनला आहे. अनेक प्रयत्न करूनही ते यातून बाहेर आलेले नाहीत. काही बदल अजूनही बाकी आहेत आणि देशातील तरूण वर्गालाच करायचे आहेत. राजकीय घराणेशाही देशासमोरी एक आव्हान आहे. त्याचं मूळासकट उच्चाटन होणं आवश्यक आहे. आता केवळ आडनावांवर निवडणुका जिंकणाऱ्या लोकांचे दिवस बदलत चालले आहेत. परंतु घराणेशाही मूळापासून संपली नाही," असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हलला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते."स्वामी विवेकानंद म्हणत असतं जुन्या धर्मानुसार जो देवावर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक आहे. परंतु नवा धर्म सांगतो की जो स्वत:वर विश्वास ठेवत नाहीत ते नास्तिक आहेत. यापूर्वी देशात कोणती व्यक्ती राजकारणाकडे वळली तो बिघडत चालला आहे अशी धारणा होती. राजकारणाचा अर्थच तसा बनला होता. भांडण, लुटमार, भ्रष्टाचार या गोष्टी होत्या. लोकं म्हणत होती की सर्वकाही बदलू शकतं परंतु राजकारण नाही," असंही मोदी यावेळी म्हणाले. न घाबरणारे, स्वच्छ हृदयाचे, साहसी आणि महत्वाकांक्षी तरूणच राष्ट्राच्या भविष्याचा पाया आहेत असं स्वामी विवेकानंद म्हणत होते. ते तरूणांवर त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवत होते. देशाला प्रगतीपथावर नेण्याची संधी आपल्याला गमवायची नाहीये. पुढील २५-३० वर्षांचा कालावधी हा खुप महत्त्वाचा आहे. तरूण वर्गाला हे शतक भारताचं बनवावं लागेल. प्रत्येक आपल्या निर्णयात देशहित पाहिलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तरूणांनी पुढे आलं पाहिजे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  "आजही असे काही लोकं आहेत ज्यांचे आचारविचार, ध्येय हे आपल्या कुटुंबाला राजकारणात वाचवण्याचं आहे. राजकीय घराणेशाही बी लोकशाही मध्ये हुकुमशाहीसह अकार्यक्षमतेलाही प्रोस्ताहन देते. राजकीय घराणेशाही, राष्ट्र प्रथम या ऐवजी केवळ माझं कुटुंब हिच भावना निर्माण करते. हेच देशातील राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं कारण आहे," असंही मोदींनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद