शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नवीन दोन इमारती पडल्या धूळखात, अल्प निधीची गरज

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

भोकर : शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत व किनी येथील पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत तयार असून या इमारती भव्य निधीअभावी धूळखात पडल्या आहेत़ बांधकामासाठी लाखो रुपये निधी खर्च होवूनही थोड्याशा निधीअभावी या दोन इमारती कुचकामी ठरल्या आहेत़

भोकर : शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत व किनी येथील पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत तयार असून या इमारती भव्य निधीअभावी धूळखात पडल्या आहेत़ बांधकामासाठी लाखो रुपये निधी खर्च होवूनही थोड्याशा निधीअभावी या दोन इमारती कुचकामी ठरल्या आहेत़
मागील दोन वर्षापूर्वी भोकर पंचायत समितीची नवीन इमारत उभारली़ या इमारतीसाठी १ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपये खर्च झाला़ पण जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे या इमारतीसाठी रंगरंगोटी, फरशी, विद्युतीकरण या कामासाठी मागील दोन वर्षांपासून निधीच उपलब्ध होवू शकला नाही़ यामुळे ही इमारत धूळखात पडली आहे़ सध्या पंचायत समितीचा कारभार बोरगाव रस्त्यावरील शिक्षण विभागाच्या इमारतीतून चालत आहे़ बसस्थानकापासून लांब असलेल्या या पंचायत समितीकडे कामासाठी जाणार्‍या गरजवंतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ मागील चार वर्षापूर्वी किनी येथे पशूवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधली गेली़ या इमारतीसाठी अद्यापपर्यंत वीज जोडणी व पाण्याची व्यवस्था न झाल्याने ही इमारतही शोभेची वस्तू ठरली आहे़
या दोन्ही इमारती उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला़ पण अल्प निधीअभावी या दोन्ही इमारती आज धूळखात पडल्या आहेत़ चालू वर्षात निधी उपलब्ध झाल्यास या दोन्ही इमारतीत कारभार सुरू होणार आहे़ यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे़