नवीन दोन इमारती पडल्या धूळखात, अल्प निधीची गरज
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
भोकर : शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत व किनी येथील पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत तयार असून या इमारती भव्य निधीअभावी धूळखात पडल्या आहेत़ बांधकामासाठी लाखो रुपये निधी खर्च होवूनही थोड्याशा निधीअभावी या दोन इमारती कुचकामी ठरल्या आहेत़

नवीन दोन इमारती पडल्या धूळखात, अल्प निधीची गरज
भ कर : शहरातील पंचायत समितीची नवीन इमारत व किनी येथील पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत तयार असून या इमारती भव्य निधीअभावी धूळखात पडल्या आहेत़ बांधकामासाठी लाखो रुपये निधी खर्च होवूनही थोड्याशा निधीअभावी या दोन इमारती कुचकामी ठरल्या आहेत़मागील दोन वर्षापूर्वी भोकर पंचायत समितीची नवीन इमारत उभारली़ या इमारतीसाठी १ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपये खर्च झाला़ पण जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे या इमारतीसाठी रंगरंगोटी, फरशी, विद्युतीकरण या कामासाठी मागील दोन वर्षांपासून निधीच उपलब्ध होवू शकला नाही़ यामुळे ही इमारत धूळखात पडली आहे़ सध्या पंचायत समितीचा कारभार बोरगाव रस्त्यावरील शिक्षण विभागाच्या इमारतीतून चालत आहे़ बसस्थानकापासून लांब असलेल्या या पंचायत समितीकडे कामासाठी जाणार्या गरजवंतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ मागील चार वर्षापूर्वी किनी येथे पशूवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधली गेली़ या इमारतीसाठी अद्यापपर्यंत वीज जोडणी व पाण्याची व्यवस्था न झाल्याने ही इमारतही शोभेची वस्तू ठरली आहे़ या दोन्ही इमारती उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला़ पण अल्प निधीअभावी या दोन्ही इमारती आज धूळखात पडल्या आहेत़ चालू वर्षात निधी उपलब्ध झाल्यास या दोन्ही इमारतीत कारभार सुरू होणार आहे़ यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे़