शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीदरम्यान कारमध्ये सापडलं घबाड, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, आता इन्कम टॅक्स विभागाकडून तपास सुरू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:37 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे तपासणीदरम्यान, एका कारमधून सुमारे दीड कोटी रुपये आणि ४५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने प्राप्तिकर विभागाला नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली.

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे तपासणीदरम्यान, एका कारमधून सुमारे दीड कोटी रुपये आणि ४५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने प्राप्तिकर विभागाला नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली. या टीमला नोटा मोजण्यासाठी सुमारे दोन तास लागले.स सध्या कारमधून प्रवास करत असलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील तपास केला जात आहे. 

ही संपूर्ण घटना मांट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यमुना एक्स्प्रेसवरील जाबरा टोल प्लाझा येथे तपासणीदरम्यान एका कारमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली. रोख रकमेसोबत अर्धा किलो सोनंही सापडलं. ही रक्कम मोजण्यासाठी मशीन मागवण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन तासांमध्ये मोजणी पूर्ण झाली. तसेच कारमध्ये एकूण १ कोटी ४९ लाख रुपये असल्याचे समोर आले.

मथुरा येथील गोविंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक खंडेलवाल हे दिल्ली येथून चांदी आणून आग्रा येथे विक्री करतात. तसेच विक्रीचे पैसे घेऊन दिल्लीला जातात, अशी माहिती प्राप्तिकर विभाग आणि पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी टोल नाक्याजवळ नाकेबंदी केली होती. त्यानंतर मथुरा येथून येथ असलेल्या स्विफ्ट कारला अडवून तिची तपासणी केली. त्या तपासणीदरम्यान, कारमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोनं सापडलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIncome Taxइन्कम टॅक्सUttar Pradeshउत्तर प्रदेश