शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

Suresh Jagubhai Patel: ईडीच्या छापेमारीत मिळाली 'बक्कळ' संपत्ती; नोटा आणि रक्कम पाहून अधिकारीही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:28 IST

During raids at the residential and business premises of gangster Suresh Jagubhai Patel and his accomplices in Gujarat, ED seized cash worth Rs 1.62 crore : ईडीच्या छापेमारीत तब्बल १.६२ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

गुजरातमधील गँगस्टर आणि त्याच्या साथीदारांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला मोठी रक्कम मिळाली. गँगस्टर सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या निवासी आणि व्यावसायिक परिसरांच्या झडतीदरम्यान, ईडीने मोठ्या स्थावर मालमत्तांचा शोध लावला. ईडीच्या छापेमारीत तब्बल १.६२ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यापैकी १ कोटी रूपये २ हजाराच्या नोटा होत्या.

दरम्यान, ईडीने १०० हून अधिक मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. यामध्ये कंपन्या, फर्म आणि आस्थापना यांच्याशी झालेल्या व्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच डिजिटल पुराव्यांशिवाय तीन बँक लॉकर्स देखील आढळून आले. ईडीच्या पथकाने आरोपी सुरेश जगुभाई पटेल आणि त्याच्या साथीदारांच्या ९ निवासी आणि व्यावसायिक परिसरांची झडती घेतली. ईडीने ही छापेमारी गुजरातमधील दमण आणि वलसाडमध्ये केली. 

गुजरातमधील या छापेमारीत २ हजारांच्या नोटांचा एवढा मोठा साठा सापडल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम आहे. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिली आहे. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावने देणे बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारी