शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मोदी यांच्या काळात ईडीच्या धाडीत २,६०० टक्के वाढ; जप्तीचे प्रमाण १,८०० टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 06:52 IST

संपुआच्या १० वर्षांशी तुलना; केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केली आकडेवारी

- हरीश गुप्तानवी दिल्ली : २००४-२०१४ या काळातील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारच्या तुलनेत मागील सात वर्षांत (मोदी यांचा कार्यकाळ) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल २,६०० टक्के अधिक धाडी टाकल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.प्राप्त माहितीनुसार, २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात ईडीने फक्त ११२ धाडी टाकल्या होत्या. याउलट २०१४ ते २०२२ (२८ फेब्रुवारीपर्यंत) या काळात २,९७४ धाडी टाकण्यात आल्या. याचाच अर्थ संपुआ सरकारच्या तुलनेत मोदी सरकारच्या काळात ईडीच्या धाडीत २,६०० टक्के वाढ झाली आहे. मोदी यांच्या कार्यकाळात संपत्ती जप्तीचे प्रमाणही १,८०० टक्क्यांनी वाढले आहे. २००४ ते २०१४ या काळात ५,३४६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मोदी यांच्या कार्यकाळात मात्र ९५,४३२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. काँग्रेस सरकारच्या तुलनेत १८ पट अधिक जप्ती मोदी काळात झाली आहे. ईडीने ४,९६४ अंमलबजावणी गुन्हे माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंदले आहेत. आकडेवारी काय सांगते?२८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एकूण ९४३ प्रकरणांत फिर्याद तक्रारी (प्रोसेक्युशन कम्प्लेन्ट) दाखल करण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रकरणे खटल्यांच्या विविध टप्प्यात आहेत. १५  मार्च २०२२ पर्यंत मनी लाँड्रिंग विशेष न्यायालयाकडून २३ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच केवळ एका खटल्यात आरोपी गुणवत्तेच्या आधारावर मुक्त झाला आहे.यातील ८३९ फिर्याद तक्रारी (प्रोसेक्युशन कम्प्लेन्ट) मागील सात वर्षांत दाखल झाल्या आहेत. २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात केवळ १०४ फिर्याद तक्रारी दाखल झाल्या होत्या.ईडीच्या धाडीतील विक्रमी वाढीचे सरकारकडून जोरदार समर्थन करण्यात आले आहे. वाढलेल्या धाडीतून मनी लाँड्रिंग रोखण्याच्या बाबतीत सरकारची कटिबद्धता तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुप्त वित्तीय माहिती गोळा करण्याच्या व्यवस्थेत झालेली सुधारणा दिसून येत आहे, असे सरकारने म्हटले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय