शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्रानं मागितले होते 7.5 कोटी, भगवंत मान यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 21:49 IST

1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते.

पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे 7.5 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोदी सरकारवर केला आहे. पंजाब विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख करत ही माहिती दिली.

मुंख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, मी आणि आम आदमी पक्षाचे नेते साधू सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, की आपण हे पैसे आम्हाला मिळणाऱ्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या (MPLAD) निधीतून कापून घ्या आणि या बदल्यात आम्हाला फक्त, पंजाब भारताचा भाग नाही, आम्ही लष्कर भाड्याने घेत आहोत, असे लिहून द्या. 

पठाणकोट एअरबेसवर हल्ल्या झाल्यानंतर, लष्कर नंतर पोहोचले, त्याआधी सरकारचे पत्र आले, की लष्कर पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे, यामुळे पंजाबला 7.5 कोटी रुपये द्यावे लागतील, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील मुख्यमंत्री मान यांच्या भाषणाचा तो भागही प्रसिद्ध केला आहे. 

1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते. सुमारे 80 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर पठाणकोट हल्ल्याचा बदला घेत भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली होती.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआपBJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्ला