शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याही काळात झाले होते सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:52 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचा वारंवार उल्लेख केला जात आहे. तर सैन्य दलांच्या पराक्रमावरून सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधक मोदी आणि भाजपावर टीका करत आहेत. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच आपल्या सरकारच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादीच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांवर भाष्य करताना सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख केला होता. ''आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेकदा सर्जिकल स्ट्राइक झाल्या.  या कारवाया संरक्षण आणि देशविरोधी शक्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्या होत्या. निवडणुकीत मत मिळवण्यासाठी करण्यात आल्या नव्हत्या,'' असा टोला मनमोहन सिंग यांनी या मुलाखतीतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला होता. त्यानंतर आज काँग्रेसकडून आपल्या सरकारच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादी प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादी वाचवून दाखवली. या यादीत एकूण सहा सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करण्यात आला आहे. या यादीतील सर्जिकल स्ट्राइक पुढील प्रमाणे आहेत. 19 जून 2008 - भटकल पुंज, पुंछ30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2011 - शारदा सेक्टर, केलमधील नीलम नदीच्या खोऱ्यात6 जानेवारी 2013 - सावन पत्र चेकपोस्ट 27 आणि 28 जुलै 2013 - नाजपीर सेक्टर 6 ऑगस्ट 2013 - नीलम खोरे 14 जानेवारी 2014  - तत्कालीन लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी 23 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या एका सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला होता.तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेखही काँग्रेसकडून करण्यात आला. यात 21 जानेवारी 2000 रोजी नदाला एन्क्लेव्ह आणि 18 सप्टेंबर 2003 रोजी बरोह सेक्टर येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करण्यात आला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndian Armyभारतीय जवान