Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:55 IST2025-10-31T19:52:42+5:302025-10-31T19:55:48+5:30
Dularchand Yadav News: मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या मृत्यू प्रकरणात संशस्यास्पद माहिती समोर आली.

Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
मोकामा येथील दुलारचंद यादव यांच्या मृत्यू प्रकरणात संशस्यास्पद माहिती समोर आली. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या एका वक्तव्यामुळे या प्रकरणाला अनपेक्षित वळण आले. दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नसल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने स्पष्ट केले आहे.
डॉ. अजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन डॉक्टरांच्या पथकाने दुलारचंद यादव यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले. डॉ. कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, "दुलारचंद यांना घोट्याजवळ गोळी लागली आणि ती गोळी पायातून पार झाली. अशा प्रकारच्या बंदुकीच्या गोळीने मृत्यू होणे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे." तपासणीदरम्यान डॉक्टरांना दुलारचंद यादव यांच्या शरीरावर इतर अनेक जखमा देखील आढळून आल्याचे सांगण्यात आले.
दुलारचंद यादव हत्याकांड से जुड़ी बड़ी खबर:पोस्टमार्टम करने वाले डॉक्टरों की टीम के अनुसार, दुलारचंद यादव की मौत गोली लगने से नहीं हुई है। टीम में शामिल डॉ. अजय कुमार ने बताया कि दुलारचंद यादव को एंकल जॉइंट के पास गोली लगी थी, जो पैर को आर-पार कर गई, लेकिन मौत का कारण गोली नहीं… pic.twitter.com/aPDfCkE42O
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) October 31, 2025
डॉक्टरांच्या या विधानामुळे दुलारचंद यादव यांच्या मृत्यूचे मूळ कारण काय, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गोळीमुळे मृत्यू झाला नसल्यास, हाणामारीच्या वेळी नेमके काय घडले? ज्यामुळे त्यांचा जीव गेला, याबद्दलचे गूढ वाढले आहे. शवविच्छेदन पथक सर्व वैद्यकीय पुरावे आणि शरीरावरील जखमा विचारात घेऊन लवकरच आपला अंतिम अहवाल पोलिसांना सादर करणार आहे.
या घटनेमुळे मोकामा परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी आता अधिकृत वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आपला तपास सुरू ठेवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.