तांत्रिक बिघाडामुळे फेसबूक पडले बंद
By Admin | Updated: June 20, 2014 14:35 IST2014-06-19T13:58:28+5:302014-06-20T14:35:57+5:30
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेले 'फेसबूक' काही काळासाठी बंद पडले होते.

तांत्रिक बिघाडामुळे फेसबूक पडले बंद
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असलेले 'फेसबूक' काही काळासाठी बंद पडले होते. तांत्रिक बिघाडामुळे गुरूवार दुपारी १.३० वाजल्यापासून फेसबूक बंद पडले. फेसबूकचे होमपेज व इतर पेजेसवर 'Sorry, something went wrong' असा मेसेज झळकत होता. तसेच मोबाईलवरही फेसबूक बंद पडले होते व असाच मेसेज दाखवत होते.
१५ मिनिटांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रॉब्लेमबद्दल जगभरातून लाखो युजर्सनी तक्रार नोंदवली. अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि आशियातील अनेक युजर्सनी ट्विटरवरही याबद्दल नाराजी व्यक्त केली. यापूर्वी ९ मे रोजी फेसबूकवर अशीच समस्या निर्माण झाली होती, त्यावेळी एररमुळे लाखो युजर्सना फेसबूकवर लॉग-इनच करता येत नव्हते.