अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले बातमीचा जोड

By Admin | Updated: March 24, 2015 23:44 IST2015-03-24T23:07:01+5:302015-03-24T23:44:39+5:30

या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्‍यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, डाळींब, द्राक्ष या पिकाच्या झाडांच्या साली निघाल्या. गेल्या वर्षी बिलपुरी, सारदे, खामलोण, आसखेडा, पिंगळवाडे या प˜्यात गारपीट झाली होती. या गारपिटीची तीव्रता प्रचंड होती. डाळिंबाची झाडे या गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त झाली. अजूनही ही झाडे फलधारणा करू शकत नाहीत. तेल्या रोगाचा डाळींब पिकाला प्रादुर्भाव नव्हता; मात्र गारपीट झाली व येथे तेल्या व मर रोगाने थैमान घातले. डाळींब पीकच या भागातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Due to the sudden change of the farmers' schedule was changed | अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले बातमीचा जोड

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे वेळापत्रक बदलले बातमीचा जोड

या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्‍यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, डाळींब, द्राक्ष या पिकाच्या झाडांच्या साली निघाल्या. गेल्या वर्षी बिलपुरी, सारदे, खामलोण, आसखेडा, पिंगळवाडे या प˜्यात गारपीट झाली होती. या गारपिटीची तीव्रता प्रचंड होती. डाळिंबाची झाडे या गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त झाली. अजूनही ही झाडे फलधारणा करू शकत नाहीत. तेल्या रोगाचा डाळींब पिकाला प्रादुर्भाव नव्हता; मात्र गारपीट झाली व येथे तेल्या व मर रोगाने थैमान घातले. डाळींब पीकच या भागातून नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस होतो आहे. मोसम प˜्यात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उन्हाळ कांद्याची सध्या लागवड झालेली आहे. या कांद्यावर करपा रोगाने आक्रमण केले आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कांदा उत्पन्न तर घटतेच, त्याची टिकाऊ क्षमतासुद्धा घटते. या अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. या पावसाने गहू आडवा पडला आहे, तर हरबरा पिकावर घाटेअळीने आक्रमण करावयास सुरुवात केली आहे. याचा परिणाम हरबरा गळून पडायला सुरुवात झाली आहे.
मुळात शेती व्यवसाय न परवडणारा झाला आहे. शेतीची मशागत वापरावयाची औषधे तर महागडी मजुरी यामुळे बर्‍याचशा शेतकर्‍यांना शेती परवडत नाही. कर्ज वाढत आहे. आत्महत्त्यांचे प्रमाण यामुळेच वाढले आहे. घरातली कर्ती मुले घरातून निघून जात आहेत. निसर्गाचा प्रकोप थांबत नाही. शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
पूर्वी शेती व्यवसायाकडे टाकाऊ म्हणून बघितले जाई. बाजरी, ज्वारी, मठ, मूग, भुईमूग ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. या पिकांपासून फारसे उत्पन्न मिळणे अशक्य होई. मात्र २00१ नंतर या भागात द्राक्ष, डाळींब शेती सुरू झाली आणि शेती व्यवसायात क्रांती घडली.

Web Title: Due to the sudden change of the farmers' schedule was changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.