पगारेच्या हत्त्येमुळे शहर वेठीस

By Admin | Updated: May 10, 2014 20:15 IST2014-05-10T20:07:11+5:302014-05-10T20:15:24+5:30

नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वेठीस धरले गेले़ याबाबत नागरिकांनी शहरातील वाढलेल्या टोळीयुद्धाबद्दल नाराजीही व्यक्तकेली आहे़

Due to the salary of the city, | पगारेच्या हत्त्येमुळे शहर वेठीस

पगारेच्या हत्त्येमुळे शहर वेठीस

नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वेठीस धरले गेले़ याबाबत नागरिकांनी शहरातील वाढलेल्या टोळीयुद्धाबद्दल नाराजीही व्यक्तकेली आहे़
शुक्रवारी रात्री मल्हारखाण येथील सराईत गुन्हेगार भीम पगारेची टोळक्याने निर्घृणपणे हत्त्या केली़ या हत्त्येनंतर त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता सुमारे पाचशे ते सहाशे नागरिकांचा जमाव जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून होता़ या जमावाला किमान दर अर्धा तासाच्या अंतराने पोलिसांना बाहेर हुसकावेे लागत होते़ पोलीस आणि जमाव यांचा रात्रभर हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता़
जिल्हा रुग्णालयाबाहेरच्या गर्दीत शनिवारी सकाळी अजूनच भर पडली़ या ठिकाणी जमलेल्या जमावाने मयत भीम पगारेच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ एका पोलीस अधिकार्‍याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने कंट्रोलला फ ोन करून पोलिसांची जादा कुमक मागवून घेतली़ पोलिसांची जादा कुमक आल्यानंतर या जमावाला पिटाळणे पोलिसांना शक्य झाले़ दरम्यान, यावेळी जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांचेही हाल झाले़ तसेच जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील गर्दीतून वाट काढणेही काही वेळ जिकिरीचे झाले होते़
भीम पगारेच्या काही समर्थकांनी मल्हारखाण परिसरातील दुकाने बंद केली होती, तर गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, सीबीएस, एम़ जी़ रोड या ठिकाणी टोळक्यांनी बळजबरीने दुकानदारांना दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले़ यामुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी घडलेल्या घटनेच्या परिणामाबाबत नाराजी व्यक्त केली़ तसेच नाशकात सुरू झालेली टोळीयुद्धे व सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असल्याच्या प्रकाराबाबत पोलिसांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे काही नागरिकांनी सांगितले़

फ ोटो:- १० पीएचएमए ८३ व ८४
कायदा व सुव्यवस्थेसाठी मल्हारखाण परिसरात तैनात करण्यात आलेला प्रचंड पोलीस बंदोबस्त़

फ ोटो:- १० पीएचएमए ६५ व ६६
भीम पगारेच्या हत्त्येनंतर काही गुंडांनी दिलेल्या धमकीनंतर बंद करण्यात आलेली अशोकस्तंभावरील दुकाने़

Web Title: Due to the salary of the city,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.