पाईपलाईनच्या कामामुळे घाणीचे साम्राज्य नागरिकांचा पालिकेवर मोर्चा : स्वच्छता करण्याची मागणी
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
पाथर्डी : शहरातील चिंचपूररोड लगत पालिकेने सुरु केलेल्या बंदिस्त पाईप गटारीच्या कामामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मार्चा आणून पालिकेत ठिय्या मांडला़
पाईपलाईनच्या कामामुळे घाणीचे साम्राज्य नागरिकांचा पालिकेवर मोर्चा : स्वच्छता करण्याची मागणी
पाथर्डी : शहरातील चिंचपूररोड लगत पालिकेने सुरु केलेल्या बंदिस्त पाईप गटारीच्या कामामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी पालिकेवर मार्चा आणून पालिकेत ठिय्या मांडला़ पालिकेने ३७ लाख रूपये खर्चून चिंचपूररोड लगत बंदिस्त पाईप गटारीचे काम सुरू केले आहे़ मात्र, या परिसरात स्वच्छता होत नाही़ तसेच काम वेगाने पूर्ण होत नाही़ त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य झाले़ याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके, नगरसेवक संजय भागवत, बजरंग घोडके, सोमनाथ टेेके आदींनी पालिकेच्या निषेधार्थ घोषणा देत पालिकेवर मोर्चा आणला़ मोर्चेकर्र्यांनी पालिकेत ठिय्या मांडला़ यावेळी मोर्चेकर्यांनी मुख्याधिकारी नानासाहेब महारनोर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला़ या कामामुळे रस्त्यावरून नीट चालता येत नाही, या भागात घंटागाडी येत नाही, स्वच्छता का होत नाही, आदी प्रश्नांची सरबत्ती केली़ आंदोलक आक्रमक झाल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरूडे, मुख्याधिकारी नानासाहेब महारनोर यांनी कामाची पहाणी केली़ त्यानंतर उद्यापासून या परिसरात स्वच्छता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ आंदोलनात जाकीर शेख, लाला शेख, रेखा आंधळे, अंजुम शेख, सुमन गोसावी यांनी सहभाग घेतला़