वळवाने मोडले कंबरडे भात भुईसपाट तर भुईमुगाला मोड साळाशे हेक्टरवरील काढणी खोळंबली भात, सूर्यफूल, भुईमुगाचे ३० टक्के उत्पन्न घटणार
By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:52+5:302014-05-09T18:10:52+5:30
राजाराम लोंढे/कोल्हापूर : गेले आठ दिवस रोज झोडपून काढत असलेल्या वळवाच्यापावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोळाशे हेक्टरमधील पिकांची काढणी खोळंबली आहे. धुवाधार पावसाने काढणीला आलेले भात भुईसपाट झाले आहे, तर ढगाळ हवामान व पावसामुळे सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पन्न ३० टक्के घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वळवाने मोडले कंबरडे भात भुईसपाट तर भुईमुगाला मोड साळाशे हेक्टरवरील काढणी खोळंबली भात, सूर्यफूल, भुईमुगाचे ३० टक्के उत्पन्न घटणार
र जाराम लोंढे/कोल्हापूर : गेले आठ दिवस रोज झोडपून काढत असलेल्या वळवाच्यापावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोळाशे हेक्टरमधील पिकांची काढणी खोळंबली आहे. धुवाधार पावसाने काढणीला आलेले भात भुईसपाट झाले आहे, तर ढगाळ हवामान व पावसामुळे सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पन्न ३० टक्के घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वळवाने फारच लवकर हजेरी लावल्याने शेतकर्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्यावर्षी २५ मेला पहिला वळीव पाऊस झाला होता. यावेळी एप्रिलमध्येच वळवाने हजेरी लावून त्यानंतर सातत्य ठेवल्याने शेतकर्यांची पंचाईत झाली आहे. गेल्यावर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकर्याने उन्हाळी भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी केली होती. हातकणंगले व शिरोळ तालुका वगळता जिल्ात कमी-जास्त प्रमाणात उन्हाळी भात, सूर्यफूल, मका व भुईमूग घेतले जाते. जानेवारी महिन्यात पेरणी झालेली पिके काढणीस आलेली आहेत. तर फेबु्रवारीमध्ये पेरलेले सूर्यफूल परिपक्वतेत आहे. गेले आठ-दहा दिवस असलेल्या ढगाळ हवामानामुळे परागीकरणाची गती काहीसी मंदावली आहे. परिणामी सूर्यफूल भरण्याची प्रक्रियाही कमी झाली आहे. काढणीस आलेल्या सूर्यफुलांचेही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भुईमुगाच्या जाळीभोवती पाणी तुंबल्याने शेंगांना मोड येण्याचा धोका अधिक आहे. सध्या भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. आणखी आठ दिवसांत काढणीस गती येणार असून, असाच पाऊस राहिला, तर भुईमूग पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वच तालुक्यांत साधारणत: उन्हाळी भात हे नदीकाठच्या जमिनीत घेतले जाते. अगोदर पेरणी झालेल्या भाताच्या कापण्या सुरू झाल्या आहेत. रोज वळीव झोडपत असल्याने भाताची मळणी करताना शेतकर्यांची दमछाक होत आहे. काढणीनंतर भिजलेले भात उन्हात घालायचे म्हटले, तर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भाताबरोबर पिंजरही खराब होऊ लागले आहे. तर वळवाच्या जोरदार तडाक्याने काढणीस आलेले भात अक्षरश: भुईसपाट झाले आहे. भातावर पाणी साचल्याने भात कापायचे कसे? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. वळवाचा रोज तडाका असल्याने साळाशे हेक्टरमधील काढणी खोळंबली आहे. त्याचबरोबर खरीप पेरणीच्या मशागतीची कामेही ठप्प झाली आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शेतीच्या कामकाजावर झालेला आहे. चौकटी-उसाला पोषक, भाजीपाल्याला मारकवीजेच्या भारनियमनामुळे एप्रिल-मे महिन्यांत उसाला पाण्याचा फेरा वेळेत बसत नाही. परिणामी उसाची उंची खुंटते, हा पाऊस उसाला पोषक ठरत आहे. धुवाधार पावसाने शेतकर्यांचे एक-दोन पाणी देणे वाचले आहे. पण काढणीस आलेल्या पिकांसह भाजीपाल्याला हा पाऊस मारक ठरत आहे. दुष्काळात तेरावा महिना!यंदा बनावट सूर्यफूल बियाण्याने शेतकरी हैराण आहे. फुले अर्धवट भरल्याने उत्पन्नात घट येणार आहे. जी अर्धवट आहेत, ती काढणीसाठी आली असताना रोजच्या पावसाने त्याचीही नासाडी होऊ लागल्याने सूर्यफूल उत्पादक शेतकर्यांच्या दृष्टीने हे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल. हंगाम लांबल्याचा फटकासाखर कारखान्यांचा हंगाम यंदा तब्बल एक महिन्याने पुढे गेला. परिणाम जानेवारीमधील पेरण्या फेबु्रवारीअखेरपर्यंत चालल्या. ही पिके मे महिन्याच्या अखेरीस काढणीस येणार आहेत. वळवाची अशीच चाल राहिली तर या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे. उन्हाळी पिकांचे क्षेत्र हेक्टरमध्ये असे -सूर्यफूल - ६४४भुईमूग - ७३०भात - ३१७मका - २१७ज्वारी - ७५------------------------------------------कोट -वळीव पावसाने अगोदर पेरणी झालेल्या सूर्यफूल, भुईमूग, भात पिकांचे नुकसान होत आहे. असाच पाऊस आणखी आठ-दहा दिवस राहिला, तर शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. - सुरेश मगदूम (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद) गेले आठ दिवस पाऊस दमवत आहे. रोज झोडपून काढत असल्याने हातातोंडाला आलेली पिके काढायची की तशीच शिवारात ठेवायची, असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे. या पावसाने भातासह सर्वच पिकांच्या उत्पन्नात किमान ३० टक्के घट होणार आहे. - बाबूराव बापू खाडे (शेतकरी, सांगरुळ)